भोंदू कालीचरणची कोर्टातून जामीनावर सुटका

अभिजित सारंग उर्फ कालीचरण याची ठाणे न्यायालयाने १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामिन मिळाल्यानंतर सुटका केली आहे. २९ डिसेंबर रोजी महात्मा गांधीबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याप्रकरणी कालीचरण याच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती.;

Update: 2022-01-28 12:11 GMT

कालीचरणला ठाणे न्यायलयाने ३ फेब्रुवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. २६ डिसेंबर रोजी एका भाषणादरम्यान. कालिचरण याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये महात्मा गांधीजीबाबत आक्षेपार्ह व्यक्तव्य करताना दिसत होता. कालीचरण यांनी भारताच्या फाळणीसाठी गांधीना जबाबदार धरले आणि गांधीचा मारेकरी नथुराम गोडसेला पाठींबा देऊन गोडसेचे हत्येबद्दल आभार मानले.व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्याविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यामुळे त्याला ३० डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

कालीचरणचे वकील पप्पु मोरवाल यांनी जामिनासाठी कोर्टात युक्तीवाद केला."जर त्याचप्रकरणाचा तपास एका विशिष्ठ पोलिस ठाण्यात सुरु असेल तर त्याच प्रकारणासाठी अन्य पोलिस ठाण्याच्या कोठडीची गरज काय़? पुणे न्यायलयाने त्यांना यापुर्वीच जामिन मंजूर केला आहे आणि त्यामुळे ठाणे सत्र न्यायालयानेही गुरवारी १५ हजार रुपयांच्या जामिनावर सुटका केली." असे पप्पु मोरवाल यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News