Corona Effect : एप्रिल महिन्यात 75 लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या
बेरोजगारीने कॅलेंडर वर्षातील चार महिन्यांमधील उच्चांक गाठला आहे.;
मुंबई: गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत अनेकांचे रोजगार गेले होते. तर दुसऱ्या लाटेत सुद्धा अशीच काही परिस्थिती असून, एकट्या एप्रिल महिन्यात ७५ लाख लोक बेरोजगार झाले आहेत.'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'च्या (सीएमआयई) एका अहवालात ही माहिती समोर आली आहे.
केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार बेरोजगारीचा दर एप्रिलमध्ये ७.९७ टक्के झाला आहे. शहरी भागातील बेरोजगारीचा दर ९.७८ टक्के, तर ग्रामीण भागात ७.१३ टक्के आहे. मार्चमध्ये राष्ट्रीय बेरोजगारीचा दर ६.५० टक्के होता.