कोरोनाच्या त्सुनामीने आरोग्य यंत्रणा कोलमडून पडतील:WHO

कोरोनाच्या त्सुनामीने आरोग्य यंत्रणा कोलमडून पडतील;

Update: 2021-12-30 08:15 GMT


जगभरात नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू असतानाच कोरोनाने डोकं वर काढलं आहे. या पार्श्वभुमीवर सरकारने नववर्षाच्या कार्यक्रमांवर निर्बंधही जारी केले आहेत. तर दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) कोरोनाव्हायरसच्या या त्सुनामीत जगभरातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा कमी पडतील असा इशारा दिला आहे. डब्ल्यूएचओ प्रमुख टेड्रोस यांनी कोरोनाच्या नवीन व्हेरिअंट ओमिक्रॉनबाबत बोलताना हा व्हेरिएंट वेगाने पसरत आहे आणि त्याच वेळी डेल्टा व्हायरसचा देखील प्रसार वेगाने होत असल्याने कोरोनाची त्सुनामी येऊ शकते असा इशारा दिला आहे. त्यामुळं आरोग्य कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडू शकतो. तसंच आरोग्याच्या पायाभूत सुविधा कमी पडतील असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

माध्यमांशी बोलताना टेड्रोस म्हणाले आरोग्य पायाभूत सुविधांवर दबाव वाढण्याच्या कारणांमधील महत्त्वाचं कारण म्हणजे कोरोनाव्हायरसच्या नवीन व्हेरिएंटमुळेर अनेक आरोग्य कर्मचारी आजारी पडले आहेत. त्यामुळं आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे.

गेल्या 1 महिन्यात, Omicron जगभरातील बहुतेक देशांमध्ये पसरला आहे आणि त्याच वेळी डेल्टा व्हेरिएंटमुळे ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेत कोरोनाचे हजारो प्रकरणे समोर येत आहेत.

नवीन कोरोनाच्या व्हेरिएंट शी लढण्यासाठी आरोग्याच्या सुविधा मजबूत असणे आवश्यक असल्याचं मत जागितक आरोग्य संघटनांनी व्यक्त केलं आहे.

महामारीच्या काळात जगभरातील आरोग्य कर्मचारी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने काम करत आहेत आणि अशा परिस्थितीत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा तणाव वाढू शकतो. अशा परिस्थितीत आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर मोठा तणाव वाढू शकतो.

2022 मध्ये कोरोना महामारी संपेल अशी आशा WHO ने व्यक्त केली आहे. मात्र, WHO ने दिलेल्या माहितीनुसार 2021 च्या अखेरीस प्रत्येक देशातील 40 टक्के लोकसंख्येचे यासाठी लसीकरण पूर्ण होणं गरजेचं आहे. 2022 च्या मध्यापर्यंत प्रत्येक देशातील 70 टक्के लोकांचं पूर्ण लसीकरण होणं गरजेचं आहे.

भारतातही ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत आणि अशा परिस्थितीत हा विषाणू बहुतांश राज्यांमध्ये पसरला असताना आरोग्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि त्याबाबत सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. ओमिक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकांमुळे पाच राज्यांमध्ये होणाऱ्या रॅलींमुळे या विषाणूचा प्रसार वेगाने होण्याचा धोकाही वाढला आहे.

Tags:    

Similar News