आणखी एक हवाई वाहतूक कंपनी बुडाली | Go First Bankruptcy

गो फर्स्ट [Go First] ही हवाई वाहतूक कंपनी बुडाली.;

Update: 2023-05-03 06:04 GMT

गो फर्स्ट [Go First] अर्थात गो एअर ही हवाई वाहतूक कंपनी सध्या चर्चेत आहे. वाडिया ग्रुपची (Wadia Group)  मालकी असलेल्या गो एअर कंपनीनं नॅशनल कंपनी लॉ प्राधिकरण दिल्लीकडे दिवाळखोरीत निघाल्याचा प्रस्ताव सादर केला आहे. गो एअर [Go Air] कंपनीनं त्यांच्या सर्व नियोजित वाहतूक फे-या 5 मे पर्यंत रद्द केल्या आहेत. आर्थिक दिवाळखोरीमुळं कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

साधारणपणे दोन वर्षांपूर्वी कंपनीनं 3 हजार 600 कोटी रूपयांचं भांडवल सार्वजनिक बाजारातून उभा करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो अयशस्वी ठरला. गो एअर ही कंपनी 17 वर्षांपासून हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत आहे. गो फर्स्ट कंपनी काही दिवसांपूर्वी गो एअर नावानं ओळखली जात होती. 2005-2006 मध्ये कंपनीनं देशांतर्गत वाहतूकीला सुरूवात केली. त्यानंतर 2018-19 मध्ये आंतरराष्ट्रीय वाहतूकीला सुरूवात केली. 

13 मे 2021 पासून कंपनीच्या आर्थिक घसरणीला सुरूवात झाली. त्यानंतर कंपनीनं गो फर्स्ट नावानं रिब्रँडिंग सुरू केलं. त्यानंतर अत्यंत कमी तिकिट दरात हवाई वाहतूकीला सुरूवात केली.

गो एअर कंपनीचा हवाई वाहतूक क्षेत्रातील शेअर 2022 मध्ये 8.8 टक्के इतका होता. सगळ्यात जास्त शेअर 50 टक्के हा इंडिगो (Indigo) या कंपनीचा आहे. त्यानंतर एअर इंडियाचा (Air India)  शेअर 10 टक्के आहे.

सध्या फर्स्ट कंपनीवर सुमारे 9 हजार कोटी रूपयांचं कर्ज आहे. शिवाय कंपनी 1800 कोटी रूपयांच्या नुकसानीत आहे. याशिवाय मार्च 2023 मध्ये कंपनीला 800 कोटी रूपयांचा आर्थिक फटकाही बसलेला आहे. 

Tags:    

Similar News