डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर एका अज्ञात माथेफिरूने हल्ला केल्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.
यामागे नेमकं कोण आहे याचे तर्कवितर्क लावले जात असतानाच भीमराव आंबेडकर यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात हल्ला करणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्याचे प्रथमदर्शनी दिसत असल्याचे म्हटले आहे. पंचवीस ते तीन वर्षे वयोगटातील ही व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून राजगृहाच्या आसपास फिरत असल्याचं आपल्या निदर्शनास आलं होतं.
त्यानंतर समोरच्या फुटपाथवर उभ्या असलेल्या या व्यक्तीला आपण एकदा हटकलं आणि तू इथे का फिरतोस असं विचारलं तेव्हा तो रागाने तिथून निघून गेला होता, अशी माहिती भीमराव आंबेडकर यांनी आपल्या जबाबात दिलेली आहे.
हे ही वाचा..
- राजगृहावरील हल्ल्याची CID चौकशी करा- रामदास आठवले
- VIDEO: कोण आहे 'राजगृहा' वर हल्ला करणारा हल्लेखोर
- राजगृहावर तोडफोड, मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया
पंचवीस ते तीस वर्ष वयोगटतला, सडपातळ बांधा, विस्कटलेले केस असलेला आणि थोडी दाढी असलेल्या या तरुणाला जर पुन्हा समोर आणले तर आपण त्याला ओळखू शकू असेही भीमराव आंबेडकर यांनी आपल्या जबाबात म्हटले आहे. या जबाबावरून हल्लेखोर मानसिक दृष्ट्या रुग्ण असल्याचं दिसत असलं तरी या निमित्ताने राजगृहा सारख्या ऐतिहासिक वास्तूच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.
राज्य सरकारने जरी आता या वास्तूला 24 तास सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला असला तरी यापुढे असे प्रकार घडू नये म्हणून सतर्क देखील रहावं लागणार आहे.