राज्यात १४ एप्रिल पासून लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा
राज्यात १४ एप्रिल पासून लॉकडाऊन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा CM Uddhav Thackeray Declared Lockdown in Maharashtra.;
आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यात कोरोनाला रोखण्यासाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. हे निर्बंध दिनांक १४ एप्रिल पासून रात्री ८ वाजल्यापासून हे नियम लागू करण्यात येतील.
राज्यात उद्या ८ वाजल्यापासून १४४ कलम लागू.. सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत अत्यावश्यक सेवा सुरु असतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु राहणार लोकल, बस अत्यावश्यक सुविधा पुरवणाऱ्या आणि अत्यावश्यक सुविधा क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी सुरु राहतील. बॅंक आणि सेबीने मान्यता दिलेली कार्यालय यांनी परवानगी… अधिस्विकृती धारक पत्रकारांना परवानगी देण्यात आली आहे.
हॉटेल रेस्टॉरंट बंद राहतील, होम डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध करण्यात येईल, कर्मचाऱ्यांना लसीकरण बंधनकारक
रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते ८ पर्यंत परवानगी