सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, मॅक्स महाराष्ट्रच्या बातमीवर शिक्कामोर्तब
सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासाची व्याप्ती वाढणार आहे, असे वृत्त मॅक्स महाराष्ट्रने दिले होते. यावर बुधवारी केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केले आहे. बिहार सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्याची शिफारस केंद्र सरकारला केली होती. ती शिफारस स्वीकारली असल्याची माहिती केंद्र सरकारने बुधवारी सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. सर्वोच्च न्यायालयात रिझा चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी झाली. केस ट्रान्सफर करण्याच्या रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी करताना कोर्टानं सर्व प्रतिवादींना आपली बाजू 3 दिवसांत मांडण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र सरकारला कोर्टाने फटकारले
“सुशांत सिंहच्या अनैसर्गिक मृत्यू प्रकरणाची चौकशी मुंबईत सुरू आहे. पटनामध्ये दाखल करण्यात आलेल्या FIRमधील आरेपांबाबत चौकशी होत आहे की नाही याची आम्हाला माहिती नाही. पण तपासासाठी गेलेल्या IPS अधिकाऱ्याला अडवले जाणे हे चांगले नाही. याप्रकरणाची चौकशी प्रोफेशनल पद्धतीने होईल याची काळजी महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे” असे कोर्टाने सुनावले.
दरम्यान रिया चक्रवर्तीच्या अटकेला स्थगिती देण्याबाबत कोर्टाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. त्याचबरोबर केंद्राचे वकील तुषार मेहता यांनी कोर्टात सांगितले की या प्रकरणाचा तपास सीबीआयद्वारे करण्याचा निर्णय़ केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे केस ट्रान्सफर करण्याच्या रियाच्या याचिकेवर आता सुनावणीची गरज नाही असे असेही त्यांनी सांगितले आहे.