CNG Gas Price : राज्यात सीएनजी वाहनधारकांसाठी राज्य सरकारचा मोठा दिलासा

गेल्या अनेक दिवसांपासून देशात इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सरकारविरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.;

Update: 2022-03-26 08:04 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून देशात इंधनाचे दर वाढत आहेत. त्यामुळे सरकारविरोधात सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यापार्श्वभुमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील सीएनजी वाहनधारकांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे.

देशात इंधन आणि नैसर्गिक गॅसच्या किंमती वाढत असल्याने ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात सरकारविरोधात असंतोष आहे. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांना दिलासा देण्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सीएनजी इंधनावरील व्हॅट 13.5 टक्क्यांवरून 3 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत राज्य सरकारने अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी (ता. 25 मार्च) रोजी अधिसूचना जारी केली. त्यामुळे सीएनजी वाहनधारकांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. तर या निर्णयामुळे सीएनजी गॅसच्या किंमतही कमी होणार आहे. हा सीएनजी वाहनधारकांना दिलासा आहे. तर हा निर्णय 1 एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे.

अजित पवार यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सीएनजी आणि पीएनजी गॅसवर राज्य सरकारकडून आकारला जाणारा व्हॅट कर 13.5 टक्क्यावरून 3 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. तर 1 एप्रिल 2022 पासून हा निर्णय लागू होणार आहे, असे अजित पवार यांनी सांगितले. या निर्णयामुळे राज्य सरकारच्या महसूलात 800 कोटी रुपयांची घट होण्याचा अंदाजही यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे रशिया युक्रेन युध्दामुळे इंधनाची दरवाढ मोठ्या प्रमाणात होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे सामान्य नागरिकांकडून कौतूक केले जात आहे.



Tags:    

Similar News