१२ ते १८ या वयोगटातील लहान मुलांना कोवॅक्सिन लस देण्यास परवानगी
कोरोना लसी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकला १२ ते १८ या वयोगटातील लहान मुलांना कोवॅक्सिन लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. DCGI ने आज २५ डिसेंबरला ही परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे;
नवी दिल्ली // कोरोना लसी संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. भारत बायोटेकला १२ ते १८ या वयोगटातील लहान मुलांना कोवॅक्सिन लस देण्यास परवानगी देण्यात आली आहे. DCGI ने आज २५ डिसेंबरला ही परवानगी दिल्याची माहिती समोर येत आहे. कोव्हॅक्सिन ही भारतातील मुलांसाठी वापरण्यासाठी मंजूर झालेली दुसरी कोविड-19 लस आहे.
सध्या जगभर कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉन झपाट्याने वाढत असताना लहान मुलांच्या कोरोनापासून बचावासाठी लसींना परवानगी देण्यात यावी अशी मागणी तज्ज्ञांकडून केली जात होती. त्यानुसार DGCI ने आपातकालीन परिस्थितीत १२ ते १८ या वयोगटातील मुलांना कोवॅक्सिनचा डोस देण्यास मान्यता दिली आहे. दरम्यान लहान मुलांना नक्की कधीपासून लस देता येईल याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही. मात्र, लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
जगभरात अनेक देशांमध्ये लहान मुलांसाठी लसीकरणास सुरू झाली आहे. अमेरिका, ब्रिटन यासारख्या प्रगत देशांनी आधीच लहान मुलांचे लसीकरण करण्यास परवानगी दिली होती. मात्र, भारतात वैद्यकीय विगाभाकडून लहान मुलांच्या लसीकरणावर फारसा जोर दिला जात नव्हता. आता मात्र, DGCI ने Covaxin च्या वापराला परवानगी दिल्याने लहान मुलांच्या लसीकरणाला जोर मिळेल असा अंदाज आहे.