अमरावतीत रस्त्यावर अवतरले यमराज ; लीगल स्केअर संस्थेचा अनोखा उपक्रम
अमरावतीत विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी लीगन स्केअर संस्थेने अनोखा उपक्रम राबवला आहे. त्यांच्या कामाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
अमरावीत : राज्यात कोरोनाचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल होताच नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करायला सुरवात केली आहे. तिकडे अमरावती शहरात देखील गर्दीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहरात पुन्हा कोरोना रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन लीगल स्केअर संस्थेने जनजागृतीसाठी अनोखा उपक्रम राबवला आहे. लीगल स्केअर संस्थेच्यावतीने रस्त्यावर यमराजाची वेशभुषा केलेल्या कलाकाराला उतवरण्यात आले आहे. हे यमराज विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांमध्ये जागृती करत आहेत.
यमराज मास्कचे महत्व पटवून देत असतानाच विनामूल्य मास्कचे वाटप देखील करत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना मास्कचा विसर पडल्याने चार - चौघात झालेली फजिती पाहून शहरात फिरणारे नागरिक मास्क घालून आपल्या पुढील कामाला जात आहे.
लीगल स्केअर संस्थेचा वतीने दोनशे ते तीनशे लोकांना मोफत मास्कचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना अजून संपलेला नाही त्यामुळे कोरोना नियम पाळा असं आवाहन लीगल स्केअर संस्थेचे अध्यक्ष सुरज जामठे यांनी केले.