लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर यांचे निधन झाले आहे. शंतनू अभ्यंकर हे चौफेर व्यक्तिमत्व होते. एक प्रथितयश डॉक्टर, उत्तम लेखक कवी, अनुवादक, नाट्यकर्मी अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला. समाजासाठी समर्पित व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. विशेष म्हणजे तीन आठवड्यापूर्वीच त्यांनी ऑर्गन डोनेशन करण्यासंदर्भात फॉर्म भरला होता. शंतनू अभ्यंकर हे मॅक्स महाराष्ट्रचे नियमित ब्लॉगर होते. डॉ शंतनू अभ्यंकर यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयात एम डी पदवी संपादन केली होती. १९९७ पासून ते सातारा जिल्ह्यातील वाई येथे वैद्याकीय व्यवसायात कार्यरत होते. अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी सहभाग घेऊन आपले रिसर्च सादर केले होते. स्त्री आरोग्यासाठी त्यांनी केलेल्या कामाबाबत त्यांना २००७ मध्ये महाराष्ट्र सरकारने डॉ आनंदीबाई जोशी या पुरस्काराने गौरवले होते.
डॉ शंतनू अभ्यंकर यांनी लिहिलेली पुस्तके
आधुनिक वैद्यकीची शोधगाथा
शास्त्रज्ञ आजीच्या गोष्टी
मला शास्त्रज्ञ व्हायचं आहे
फादर टेरेसा आणि इतर वल्ली
रिचर्ड डॉकिन्स जादुई वास्तव ( अनुवाद )
यासोबतच त्यांनी अनेक पुस्तकांचे मराठी अनुवाद देखील केले आहेत.
त्यांच्या जाण्याने साहित्य, समाजसेवा, वैद्यकीय आणि कला क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.