दिल्लीत ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; राहुल गांधी यांनी घेतली पीडितेच्या कुटुंबियांची भेट
९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेने दिल्ली हादरली आहे. दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेत, कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या सोबतच असल्याचे म्हटलं आहे.
di दिल्लीत एका ९ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार करत तिची हत्या करण्यात आल्याने दिल्ली पुन्हा हादरली आहे. संतापजनक म्हणजे हा संपुर्ण प्रकार केल्यानंतर त्या नराधमांनी पीडितेवर बळजबरीने अंत्यसंस्कार देखील केले. या घटनेमुळे आता राजकिय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी संबधित पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसेच कुटुंबियांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील केले.
दिल्लीच्या नांगलगाव परिसरातून हा धक्कादायक आणि चिड आणणारा प्रकार समोर आला होता.त्यामुळे दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्लीत माता-भगिनी सुरक्षित आहे का? असाच सवाल यानिमित्त उपस्थित केला जात आहे. दिल्लीतील या घटनेमुळे उन्नाव प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्यात.
स्मशानभुमी परिसरातील वॉटर कुलरमधून पिण्याचे पाणी आणण्यासाठी गेलेल्या या 9 वर्षाच्या मुलीवर तेथील काही नराधमांनी सामूहिक बलात्कार केला. आणि तिची हत्या केली. विशेष म्हणजे पीडित्याच्या आईला फोन करून बोलावून घेत वॉटर कुलरच्या वीजचे धक्का लागल्याचे या नराधमांनी सांगितले. तसंच याबाबत पोलिसांना सांगू नको असं म्हणत पीडितेवर घरच्यांच्या विरोधात जाऊन अंत्यसंस्कार देखील केले. त्यामुळे या प्रकरणाने दिल्ली हादरून गेली आहे.
दरम्यान या प्रकरणाने दिल्लीतील राजकारण तापले आहे, राहुल गांधी यांनी पीडितीच्या कुटुंबियांच्या भेट घेतल्यानंतर प्रतिक्रिया देतांना या कुटुंबियांना न्याय हवाय त्यांची मदत करण्यासाठी मी आलो आहे.आम्ही त्यांना सर्व मदत करू, या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत राहू असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.