केरळमधील शबरीमाला मंदिराचे वातावरण अजुनही चिघळलेलेच आहे. शबरीमला मंदिरात महिलांच्या प्रवेशावर नाराज झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी केरळमध्ये आंदोलन केले. त्यावेळी एका महिला छायाचित्रकाराला त्यांच्यातील एका भाजप कार्यकर्त्याने मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. . या छायाचित्रकाराचे नाव शाजिला अब्दुल रहमान असे आहे. शबरीमालात केरळमधील सत्य दाखवण्यासाठी एका महिला छायाचित्रकाराने केलेल्या धाडसामुळे तिच्यावर अक्षरश: हल्ला झाला.
त्याबाबतचा त्या महिला छायाचित्रकाराचा फोटो व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये ती कॅमेरा हातात घेऊन रडत रडत चित्रण करीत आहेत. तेथील आंदोलनकर्त्यांनी तिला शिव्या दिल्या, धमकी दिली परंतू तिने माघार न घेता निडरपणे तेथील सत्याचे चित्रण केले.
पत्रकार शाजिला अली फातिमा यांनी म्हटलं आहे की, मी भाजपला भीत नाही, यानंतरही भाजपच्या वाईट कृत्यांचे व्हिडिओ समोर आणत जाईन, तसेच त्या आंदोलनकर्त्यांनी तिचा कॅमेरा हिसकावण्याचा प्रयत्न केला. तरीही ती माघार घेत नव्हती म्हणून अक्षरश: तिला तेथील आंदोलकांनी लाथांनी मारले. असा आरोप पत्रकार शाजिला अली फातिमा यांनी केला आहे. त्या केरळ टिव्हीच्या व्हीडिओग्राफर आहेत.