Exclusive : अशी होतेय कौमार्य चाचणी...

Update: 2019-01-04 11:59 GMT

आजवर आपण मोठ-मोठ्या राजकर्त्यांच्या मुला-मुलींची लग्न पाहिलीत. मात्र या लग्नानंतर विवाहितेची कौमार्य चाचणी परिक्षणांची माहिती समोर आली का हो? किंवा राजकारणी मंडळी या कंजारभाट समाजातील क्रुप्रथेला साथ दिल्याची माहिती समोर आली का? नाहीना. परंतु पुण्याचे माजी नगरसेवक सुनिल मलके यांनी आपल्या मुलाच्या लग्नानंतर आपल्या सुनेची कौमार्य परीक्षा घेतली आहे. नुकतेच 30 डिसेंबर 2018 रोजी कंजारभाट समाजातील उद्योजक पुण्याचे माजी नगरसेवक सुनिल मलके यांनी आपल्या होणाऱ्या सुनेची कौमार्य परीक्षा घेतली. ज्यात जातपंचायतीने नवऱ्या मुलाला(कुणाल) मिळालेल्या मालाची म्हणजे नवविवाहितचे कौमार्य अबाधित असल्याची विचारणा तीनवेळा ‘समाधान’ शब्द उच्चारायला लावून केली.

आता बघा, एकविसाव्या शतकात विद्येच्या माहेरघरात ‘इंग्लड’वरून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वराने जातपंचायतीला शरण येत उच्च शिक्षण घेतलेल्या वधूची कौमार्य परीक्षा घेण्याला संमती दिली. वराचे वडील पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सुनील मलके तर वधूचे वडिल निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. या प्रथेला कडाडून विरोध करणारे कंजारभाट समाजातील व राज्य सरकारमधील अधिकारी कृष्णा इंद्रेकर यांनी याला वाचा फोडली.

नेमकं काय घडलं या पंचायतीच्या बैठकीत पाहा हा Exclusive व्हिडिओ...

https://youtu.be/fRzCyfu0ZHc

पाहिलात हा व्हिडिओ... आता तुम्हाला या समाजात झालेला एक बदल पाहायला मिळेल तो म्हणजे पूर्वी माल खरा की खोटा अशी नवऱ्या मुलाला विचारणा पंचमंडळीकडून केली जात होती. मात्र आता ही विचारणा करताना नवऱ्या मुलाला तू समाधानी आहेस का? असल्यास तीन वेळा समाधानी आहे असं बोलं. हा बदल कंजारभाट समाजात झालाय मात्र या क्रूप्रथेला बंद करण्यासाठी या पंचमंडळीची मानसिकता काही बदलली नाही. तसेच यात काही राजकीयमंडळींनी याला पाठिंबा दिला. खरं तर हे राजकारणात वावर असणाऱ्या व्यक्तीला शोभनीय नक्कीच नाही, असे पंच समाजाला अधोगतीकडे घेऊन जाणाऱे असतील तर त्यांना नक्कीच शासन व्हायला हवं.

आणखी एक धक्कादायक

एका बातमीनुसार कुठे डॉ. इंद्रजीत खाडेकरांसारखे शिक्षणाला आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला जागणारे प्राध्यापक ज्यांनी कालपरवाच कौमार्य परिक्षणाबाबतचा अभ्यासक्रम वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्यात यावा अशी सूचना Medical Council of India ला केली आहे. यावरुन कुठे चाललेय शिक्षण हे आपल्याला दिसू लागलेय.

दरम्यान या क्रूप्रथेला पाठिंबा देणाऱ्या राजकर्त्यांना कोणत्याच राजकीय पक्षांनी थारा देऊ नये आणि या लग्नात सामिल झालेल्या राजकारण्यांचा सुद्धा निषेध नोंदवत योग्य तो धडा देणं गरजेचं आहे. अन्यथा राजकीय पक्षांचं तसंच स्थानिक आमदार, खासदारांचं कौमार्य परीक्षण करण्यासाठी पाठबळ असल्याची शंका मनात घर करुन जाईल असे मत या कौमार्य प्रथेविरोधात लढा पुकारणाऱ्या विवेक तमायचीकर यांनी व्यक्त केलंय.

राज्य सरकारने जातपंचायतीच्या विरोधात कायदा संमत केला आहे. मात्र, कंजारभाट समाज या कायद्यालाच बगल देत छुप्प्या पद्धतीने जातपंचायती भरवत आहेत. या जातपंचायतीमध्ये विशेषत: विवाहावेळी वधूची कौमार्य परीक्षा घेण्याची कुप्रथा आहे. या कुप्रथेला कंजारभाट समाजातीलच सुशिक्षित युवक-युवतींचा कडाडून विरोध केला जात आहे. कंजारभाट समाजात भारतीय राज्य घटनेप्रमाणे समांतर कायदे आहेत. या कायद्याची अमंलबाजवणी न करणाऱ्यांना वाळीत टाकले जाते.

जातपंचायतीची एवढी दहशत आहे, की पुणे महानगरपालिकेतील माजी नगरसेवक व इंग्लडवरून उच्च शिक्षण घेऊन आलेल्या वराने उच्चशिक्षित असलेल्या वधूची 'कौमार्य' परीक्षा घेतल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

Similar News