आण्णांच्या आखाडयातल्या दमानियाताई ! - विशाल हिवाळे...

Update: 2019-08-25 04:30 GMT

अंजली दमनियाची पत संपलीय, त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. संकट समयीचा कौटुंबिक जिव्हाळाही कसा कळत नाही, आरोप करून, करून दमलेल्या दमानिया ताईंना? या पूर्वी अनेकांवर दमनीयांनी आरोप केलेत. मात्र, अदयाप एकही सिद्ध झालेला नाही. आता आप मधलं त्यांना कुत्रंही विचारत नाही. 2014 लोकसभा निवडणूकीत मेधाताई पाटकरांसाठी त्यांच्या सोबत प्रचार करताना अनेक गोष्टी त्यांच्याबाबत लक्षात आल्या होत्या!.. अचानक समाजसेवेचं व्रत घेतलेले पाण्यात निर्माण होणाऱ्या बुडबुडयासारखे असतात. दमानिया ताईंची राजकीय व सामाजिक कृती बुडबुडयासारखीच! मात्र, हे असले बिनकामाचे, शायनिंग बुडबुडे अखंड, प्रामाणिकपणे, झोकून देऊन काम करणाऱ्या परिवर्तनवादी कार्यकर्त्यांना काही काळ झोकाळून टाकतात.

भाजप विचारधारा सोडून सर्व जनता भाजपच्या हुकूमशाही प्रशासनावर नाराज आहे. त्या विरोधात बोंबलतेय, राज ठाकरेंना सहानूभूती आणि समर्थन देते असताना या बाईचं वेगळंच चाललंय. मुख्य मुद्दयांवरून महाराष्ट्रातल्या जनतेचं लक्ष विचलित करण्याची सुपारी तर नाही ना घेतली दमानियाताई ? नाही म्हणजे तुम्ही " आण्णा हजारेंच्याच तालिमीत तयार झालेल्या आहात म्हणून आपलं सहज विचारतोय!

राज ठाकरे चौकशीला सामोरे जात आहेत. त्या प्रकरणाचं जे व्हायचं ते होईलच. दोषी असतील तर कारवाई होईल नसतील तर निर्दोष सुटतील. खरा मुद्दा आहे त्यांच्यावर सुड बुद्धिने इतक्या वर्षा नंतर उगारलेल्या कारवाईचा ! भाजप म्हणतंय आमचा ईडीच्या कामात हस्तक्षेप नाही. ते त्यांचं काम करत आहेत.

कर्तव्यदक्ष अधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा इतक्या जोमाने आजच का, कामाला लागल्या ? राज ठाकरेंचं कोहीनूर प्रकरण तर गेली अनेक वर्षे अधिकाऱ्यांकडे होतं. भाजपचा हस्तक्षेप नाही तर 2014 ला सुद्धा या अधिकाऱ्यांनी राज ठाकरेंच्या मागे ईडीची पिडा लावली असती. पण या देशात आज भयंकर घटना घडविल्या जात आहेत. जो अन्याय व सरकारच्या बोगस कामा विरोधात बोलेलं तो तपास यंत्रणांचा बळी असेल. त्याला लागलीच जात्यात भरडलं जाईल.

जे तुमच्या सारखे लोक त्यांच्या सोयीचं, फायदयाचं बोलातील ते काही काळ सुपातला आनंद घेतील. नंतर त्यांची रवानगी जात्यात भरडण्यासाठी केली जाईल. त्यामुळे सर्व मानवतावादयांनी, आपले वैचारिक मतभेद, झेंडे- दंडे बाजूला ठेवून हुकूमशाही विरोधात एकत्र येऊन लढण्याची आज गरज आहे.

अशावेळी ईडीच्या कार्यालयात चौकशी करिता कुटूंबासोबत जाणाऱ्या राज ठाकरेंवर, सत्य नारायणाच्या पुजेला चाललेल की काय? असा उपरोधिक प्रश्न दमानिया ताईंनी विचारलाय. दमानिया ताईंचा बोलाविता धनी कुणीही असो त्यांनी एक महिला कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून असं बोलणं. संयुक्तिक नक्कीच नाही.. मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या वैचारिक भूमिके बाबत मतभेद असतानाही, देशातील आजच्या वास्तव परिस्थितीची धग समजून घेत, अॕड बाळासाहेब आंबेडकरांनी, बाळा नांदगावकराच्या माध्यमातून सावध करण्याचं व ईडीच्या कचाटयातून राज ठाकरेंना बाहेर काढण्याचं सुचविलं. याला म्हणतात माणूसकी आणि मैत्री भावना.

राष्ट्रवादी पक्षाच्या आ. विदयाताई चव्हाणांनी अनेकदा राज ठाकरेंच्या भूमिकेविरोधात संघर्ष केलाय, तर आम्ही सुद्धा त्यांच्या अनेक भूमिकांचा निषेध केलाय... मात्र, आज देशाची परिस्थिती चिंताजनक आहे, त्यामुळे विदयाताई चव्हाणांच्या नेतृत्वाखाली गेलेल्या आम्ही राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना या लढयात पाठिंबा असल्याचं जाहिर केलं. EVM विरोधात त्यांनी घेतलेली भूमिका व लोकसभा निवडणूकीच्या प्रचार सभां मध्ये त्यांनी केलेला सरकारचा पोलखोल हा पंतप्रधान मोदींच्या जिव्हारी लागलेला दिसतोय. अलिकडे त्यांनी घेतलेल्या या परिवर्तनशील भूमिकांचं स्वागत म्हणून तसेच सरकारच्या दमनशाही विरोधात आमचा राज ठाकरेंना पाठिंबा आहे.. अनेक पक्ष्यांचे नेते आज त्यांना पाठिंबा देत आहेत. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय भवितव्याकरिता हा स्वागतार्ह पायंडा असेल.

1925 साली या देशात स्थापन झालेली फॕसिझमची विचारसरणी मुळात नव्याने उभ्या राहणाऱ्या अखंड भारताला व अंकुरणाऱ्या लोकशाहीला चिरडून टाकण्याकरिता जन्मास घालाण्यात आली. हिटलर- मुसोलिनीच्या वारशाचं बीजारोपण तेव्हाच या देशात करण्यात आलं. स्वातंत्र्य व संविधान निर्मिती म्हणजे १९५० नंतर या वारशाने बाळसं धरलं. स्वातंत्र्योत्तर मिळालेल्या स्वातंत्र्याचा व अधिकाराचा गैरवापर करित सतत या वारशाने देशाच्या अखंडतेला व रूजणाऱ्या लोकशाहीला सुरूंग लावण्याचे प्रयत्न केले.

या देशावर मूठभरांची सत्ता ठेवायची तर लोकशाहीला खिळखिळ करून गाडलं पाहिजे हा त्यांचा एकमेव कार्यक्रम राहिला. विदयमान काळात लोकशाहीवरचे अटॕक वेगवेगळ्या माध्यमातून मोठया प्रमाणात वाढलेत. या प्रहाराची झळ स्वातंत्र्य प्रेमी प्रत्येकास सहन करावी लागतेय. ज्यांचा लोकशाहीत, स्वतंत्र राहण्याचा स्थायीभाव बनलाय अशा सर्वांना या अधिकारांचं मूल्ये टिकवत मुक्तपणे जगायचंय. त्यांना हिटलर, मुसोलिनी, राबेस्पेर या देशात जन्मास येऊ दयायचे नाहीत. हुकूमशाही वारशाची गर्भधारणा आरएसएसने केलेली असली तरी लोकशाहीचे वारस त्याचं "अबाॕर्शन" ( गर्भपात) करतील. त्यासाठीच तर लोकशाहीचे वारस राज ठाकरेंच्या निमित्ताने एकत्र येत आहेत. अंजली दमानिया सुद्धा इंडिया अगेन्स करप्शन आणि आम,आदमी पक्ष लोकशाही वारशाचं फळ, मात्र, भेसळ असल्यासारख्या त्यांच्या भूमिकेने संशयाचं वातावरण तयार झालंय. सर्व विरोधक एकत्र येऊन, लोकशाहीने दिलेलं स्वातंत्र्य टिकविण्यासाठी राज ठाकरेंच्या मागे उभे राहत असताना, दमानियाताईंचा प्रवास उलटया दिशेने सुरू झालाय. हजारो वर्षानंतर महिलांना, संविधानाधारे मिळालेल्या स्वातंत्र्याच्याचा उपभोग घेत असताना, स्वातंत्र्याचं अस्तित्व नष्ट करणाऱ्या शक्तिंना बळ देणारी भूमिका दमानियाताई घेत आहेत.

दमानीयाताईं सारखे असे अनेक फितूर लोकशाही गोटात असतील, कित्येक फितूर उघडपणे पक्षांतार करून त्यांच्या गोटात जात आहेत. दमानियाताई या फितूरीचं छोटंस उदाहारण आहेत.

कॉग्रेसच्या काळात "इंडिया आगेंस्ट करप्शन"चे फलक घेऊन, मध्यमवर्गीयांना भुरळ घालणारे तुम्ही आज देशातला सर्व भ्रष्टाचार संपल्याच्या अविर्भावात वावरताय. याच मध्यमवर्गीयांना दाहक चटके देणारे असंख्य प्रश्न भेडसावत असताना तुम्हाला कसे दिसत नाहीत? त्यावेळी कॉग्रेस सरकारच्या विरोधात दिसणारं तुमचं रौद्ररूप विदयमान सरकारच्या कार्यकाळात शेळी सारखं झालंय..

कधी कधी ते डोळे झाकून दूध पिणाऱ्या संधीसाधू मांजरी सारखंही दिसतं. म्हणजे कसं? सरकारच्या विरोधात तिळभर नाही पण सरकारला अडचणीचे ठरणाऱ्या प्रतिनिधी, मंत्र्यांविरोधात मधे मधे तुमची मांजर डरकाळी ऐकायला येते.

हवशे-नवशे- गवशे समाज सेवेत उतरत नाहीत तोच त्यांना रिझल्ट पाहिजे असतात. दारू पिऊन चिखलात लोळणाऱ्यांकरिता दर वर्षी येणारी "गटारी" हे काहींसाठी एक निमित्त असतं. तसंच काही स्वयंघोषित समाज सेवक, सेविकांचं असतं. वेळ/काळ सांभाळून समाज सेवेची हाऊस भागवून घ्यायची, फोटोसेशन करून अपेक्षितांचं लक्ष वेधून घ्यायचं. जेमतेम केलेल्या समाजसेवेच्या भांडवलावर व्याजासह भरमसाठ वसुली सुरू करायची. हाच धंदा चाललाय नकली, समाज सेवक/ सेविकांचा ! गुडघ्याला बाशिंगे लावून उतरलेल्या जून्या/ नव्या राजकारण्यांचा सुद्धा हाच धंदा !

दमानियाताई, आपण अजारी आहात असं माध्यमांद्वारे कळलेलं. कदाचित तुमची तब्येत ठिक असेल. नसेल तर आरोग्याची काळजी प्रथम घ्या. त्याकरिता आपणास शुभेच्छा. बाकी गरज लागली आणि सर्व काही आलबेल नसेल तर मध्ये मध्ये प्रस्थापित व्यवस्थेला न दुखावणारी डरकाळी फोडत चला. तुम्हाला कुठे रस्त्यावर उतरायचंय माध्यमांवर तर बोलायचं. यातूनच तुम्हाला अपेक्षित सर्व साध्य होईल. पुन्हा एकदा आरोग्यास शुभेच्छा देऊन थांबतो !..

- विशाल हिवाळे

( अध्यक्ष - संविधानवादी रिपब्लिकन पक्ष)

Similar News