समानतेसाठी सतत लढत राहणार तृप्ती देसाई यांचा विश्वास

Update: 2019-01-01 14:09 GMT

आजच्या दिवशी पहिली महिलांसाठी शाळा सुरु झाली त्यावर आपले मत व्यक्त करतांना भुमाता ब्रिगेडच्या संस्थापिका तृप्ती देसाई यांनी आपले मत व्यक्त केले आहे. “आजपर्यंत मंदिर प्रवेशासाठी "समानता "यावी म्हणून लढत असताना अनेक वेळेला आमच्यावर टीका झाली, बदनामी करण्यात आली.केरळच्या शबरीमला मंदिराच्या विषयामध्ये आमच्या विरोधात अनेक आंदोलने झाली ज्यांंनी आंदोलने केली ,आम्हाला कोची विमानतळावर अडविले त्यांनी आज आमच्या समानतेच्या लढाईच्या समर्थनार्थ पन्नास लाख महिला तमिळनाडू ते त्रिवेंद्रम पर्यंत महिला साखळी करणार आहेत हे नक्की पाहावेच तसेच मुंबईत सुद्धा चैत्यभूमी ते शिवाजी पार्क येथे सुद्धा शबरीमला मंदिरामध्ये महिलांना प्रवेश मिळालाच पाहिजे यासाठी आज मानवी साखळी केली जाणार आहे. खरतर प्रवाहाच्या विरोधात काम करत असताना अनेक वेळेला विरोध होतो परंतु त्यात सातत्य ठेवले, तर समाजात जनजागृती होते, परिवर्तन होते.जेव्हा लाखो महिला आज आम्ही जे आंदोलन उभं केलं ,आम्ही जो समानतेचा मुद्दा घेऊन पुढे गेलो त्या समानतेच्या मुद्द्याच्या समर्थनार्थ जेव्हा उतरणार आहेत तेव्हा खऱ्या अर्थाने आमचं आंदोलन यशस्वी झालं असं म्हणायला हरकत नाही.* *स्वामी विवेकानंदांनी म्हंटलेच आहे की "पहले हर अच्छी बात का मजाक बनता है फिर विरोध होता है और फिर उसे स्वीकार कर लिया जाता है" आणि हे आज आमच्या बाबतीत खरे ठरतंय.

पाहा हा व्हिडिओ -

Full View

Similar News