राजकारणी आणि चित्रपट क्षेत्र यांचं नात हे काही नवीन नाही. मात्र, जर राजकारणात अभिनय क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती येत असेल तर…?
होय, आता हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री अँजेलिना जोली राजकारणात येणार आहे. तसे संकेतच तिने दिले आहे. ती याआधी मोठ्या प्रमाणात समाजकारणात अग्रेसर होती. तसेच ती संयुक्त राष्ट्रासाठी शरणार्थी लोकांची दूत म्हणून काम करते. याबाबत अँजिलिनाने बीबीसी टुडेच्या मुलाखतीत माहिती दिली.
त्यावेळी ती म्हणाली, राजकारणात मी योग्य आहे की नाही मला माहित नाही, पण माझ्याकडे याबद्दलची प्रतिभा असल्यास याकरिता मी तयार आहे.