मंगळवारी बॉलिवूडमधील महत्वाच्या १८ अभिनेते व दिग्दर्शक यांना भेटीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावले या भेटीत सिनेमा जगतातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली या संबंधीचे वृत्त नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर हॅन्डल वरून देण्यात आलं आहे. मात्र या यादीत सिनेक्षेत्रातील एकही महिला नसल्याने पंतप्रधानांवर लैंगिक भेदभावाचा आरोप होत आहे.
या आमंत्रितांमध्ये आपल्या पंतप्रधांनानी एकही महिलेला चर्चेसाठी आमंत्रित का केले गेले नाही? या प्रश्नाची सिने जगतात चर्चा आहे. खरंतर मी टू चळवळी नंतर सिने क्षेत्रातल्या महिलांचे प्रश्न समोर आल्यानंतरही महिलांशी कुठल्याही प्रकारे चर्चा पंतप्रधानांना का कराविशी वटली नाही ? सिने क्षेत्रातील एकाही कर्तृत्ववान महिला पंतप्रधानांना का दिसली नाही? महिलांचा विसरच पडला आहे की काय ? असे प्रश्न उपस्थित करत नेटक-यांनी सोशल मिडीयावर आपली मते मांडली आहेत.
https://twitter.com/narendramodi/status/1075005835590258689
https://youtu.be/k9elNk1Ybas