इराणच्या विजयाचे श्रेय नाशिकच्या शैलजांना…

Update: 2018-08-25 13:55 GMT

कबड्डीमध्ये शुक्रवारी भारतीय महिला संघाला पराभव पत्करावा लागला. इराणकडून भारताला २४-२७ ने पराभव पत्करावा लागला. आशियाई स्पर्धेतील पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत भारताचा पराभव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. परंतू यामध्ये विशेष बाब म्हणजे इराणला हे यश ज्या प्रशिक्षकामुळे मिळाले त्या १८ महिन्यांपूर्वी भारतीय संघाच्या प्रशिक्षक होत्या. इराणच्या विजयानंतर इराणच्या प्रशिक्षिका शैलेजा म्हणाल्या, ‘कबड्डी फेडरेशनने प्रशिक्षकपद नाकारले तेव्हा मी इराणला गेले. तेथील भाषा व अन्न यामुळे अडचण झाली. कारण मी शाकाहारी आहे. मी खेळाडूंच्या दिनचर्येत योग, प्राणायाम समाविष्ट केला. याचा फायदा झाला.’ त्यामुळे इराणच्या विजयाचे श्रेय जाते ते नाशिकच्या शैलजा जैन यांना.

Similar News