शिवसेनेच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंच्या सोबतीने पक्षाचे वरिष्ठ नेते किंवा लोकप्रतिनिधी यांना हल्ली जरा लांबच्या जागा पकडाव्या लागतात. आजच्या पंढरपूरच्या सभेसाठीच्या व्यापपीठावर उद्धव ठाकरे यांच्या सोबत आदित्य आणि रश्मी ठाकरे यांचीही उपस्थिती असल्याने अन्य नेत्यांच्या जागा आपोआपच पुढे सरकवल्या गेल्या होत्या. उद्धव ठाकरे यांच्या भाषणाच्या आधी रश्मी ठाकरे स्टेजवरून खाली उतरून महिला पदाधिकाऱ्यांच्या रांगेत बसल्या. या आधीही शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यांना रश्मी ठाकरे उपस्थित राहत असत, मात्र त्या नेहमीच परिवारासाठी असलेल्या रांगेत बसायच्या, मात्र आता त्या ही स्टेजवर यायला लागल्याने शिवसेनेची स्टेजवरची आसनव्यवस्था बदललेली दिसली.