बांबूपासून तयार केलेले सॅनिटरी नॅपकिन राष्ट्रीय प्रदर्शनात सादर

Update: 2018-12-21 10:32 GMT

सॅनिटरी नॅपकिनमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला पर्याय म्हणून नवी कल्पना शालेय विद्यार्थिनींनी अंमलात आणली आहे. प्लास्टिकऐवजी बांबूपासून सॅनिटरी पॅड बनवण्याचा नवा प्रयोग खालापूरमधील रिलायन्स फाऊंडेशन शाळेच्या मराठी माध्यमातील तीन विद्यार्थिनींनी केला आहे. हा अनोखा प्रयोग २६ व्या राष्ट्रीय बालवैज्ञानिक परिषदेत सादर करण्यात आला असून ७४ प्रकल्पांना मागे ठाक प्रथम ठरला आहे. ३ ते ७ जानेवारीला इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये हा प्रकल्प सादर होणार आहे.

Similar News