प्राजक्ताने दिला जुन्या आठवणींना उजाळा!

Update: 2018-12-29 14:28 GMT

अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम आपल्या अदाकारीने व सौंदर्यांने रसिक प्रेक्षकांना घायाळ करत असते. ती एक उत्तम अभिनेत्रीसह उत्तम अशी नृत्यांकीकादेखील आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांची संख्यादेखील बरीच आहे. प्राजक्ता कायम सोशल मीडियावरही चाहत्यांसोबत संवाद साधत असते. ती तिचे अनेक फोटो किंवा सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.

तसेच प्राजक्ताने सध्या आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाउंटवरुन आपला १५ वर्षे जूना फोटो शेअर करून त्याबाबतच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने आपला भरतनाट्यम नृत्य कार्यक्रमातील एक फोटो शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/Br4e-aqg-nZ/

या फोटोमध्ये ती पारंपारिक वेशभुषेत दिसत आहे, ज्यामध्ये प्राजक्ताचे सौंदर्य अधिक खुलुन दिसत आहे. ती या फोटोबाबत म्हणाली आहे की, "भरतनाट्यमचं प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठी अरंगेत्रम सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो. यावेळी जे काही शिक्षण घेतलं ते गुरूला अर्पण करून स्वतःचा वेगळा प्रवास सुरू करता करता अरंगेत्रमचा हा फोटो असून त्याला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत यावर विश्वासच बसत नसल्याचे तिने म्हटले आहे.

 

Similar News