अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत देखील हिमतीने त्या परिस्थितीवर मात करुन कष्ट करुन सुभासिनी मिस्त्री यांनी जिल्ह्यातलं पहिल इस्पितळ बांधलं. अशा या मेहनती सरळ साध्या स्त्रीला पद्मश्री देऊन गौरविण्यात आले. सुभासिनी यांनी तब्बल २० वर्ष घरकाम केले, भाजी विकली व त्यामधून जमवलेल्या पैशांमध्ये त्यांनी गोरगरिबांसाठी मोफत उपचार मिळेल असे इस्पितळ बांधले. या इस्पितळाचे नाव म्हणजेच मानवता_हॉस्पिटल ..!
सुभासिनी मिस्त्री यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती या परिस्थितीतचं त्यांना त्यांच्या नवऱ्यावर उपचार करता आला नाही आणि फक्त पैशाच्या अभावी त्यांचा नवरा मृत्यूमुखी पडला. तेव्हा अवघ्या वयाच्या ३व्या वर्षी त्यांना वैधव्य आले. पदरात लहान ४ मुलं होती. पण अशा हलाखीच्या वेळी देखील त्या डगमगल्या नाही. नियतीने दिलेल्या ह्या व्रणाला कुरवाळत न बसता त्यांनी नियतीला सुंदर प्रत्युत्तर दिलं. आपल्या मेहनतीच्या बळावर त्यांनी मोफत उपचार करता येईल असे इस्पितळ उभारले. आणि त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी हा पुरस्कार स्वीकारला. तसेच पायात साधी स्लीपर घालून पद्मश्री स्वीकारणारी ही बाई म्हणजेच सुभासिनी मिस्त्री.