एसटी, बस, रेल्वे प्रवासात ज्येष्ठ नागरिकांना सवलत दिली जाते. मात्र रेल्वे प्रशासनाने आता तृतीयपंथीसाठी सवलत दिली असून 60 वर्षांवरील तृतीयपंथीयांना रेल्वे प्रवासात यापुढे 40 टक्के सवलत देण्याचा महत्वाचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
रेल्वे सवलत पुढीलप्रमाणे –
- महिलांना वयाच्या 58 वर्षां नंतर प्रवासात 50 टक्के सवलत
- पुरुषांना वयाच्या 60 वर्षां नंतर प्रवासात 40 टक्के सवलत
- तृतीयपंथीयांना (ट्रान्सजेंडर) वयाच्या 60 वर्षां वरील 40 टक्के सवलत