महिलांसाठी लढाऊ विमानांचे सारथ्य सोपवले जाण्याचा निर्णय दोन वर्षीपूर्वी घेण्यात आला. त्यासंदर्भात आता राज्यातून पहिली महिला 'फायटर हेलिकॉप्टर पायलट' होण्याची संधी पुण्यातील कन्येने मिळवली आहे.
श्रद्धा खांदवे असे या युवतीचे नाव असून तिची वयाच्या २४ व्या वर्षी हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्ती झाली आहे. तिने आपले प्रशिक्षण हैदराबादमध्ये पूर्ण केले. आणि आता ती हवाई दलाचा विडा उचलण्यास सज्ज झाली आहे.
श्रद्धा खांदवे ही पुण्यातील लोहगाव येथील आहे.