केमोथेरपीमुळे माझ्या दृष्टीवर परिणाम होऊ लागला आहे - सोनाली बेंद्रे

Update: 2018-11-03 14:49 GMT

अभिनेत्री सोनाली बेंद्रे सध्या कर्करोगावर उपचार घेत आहे. त्याबाबत ती नेहमीच सोशल मिडीयावर माहिती देत असते. सध्या तिने अत्यंत भावनीक अशी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने कर्करोगासाठी घेतल्या जाणाऱ्या केमोथेरपीमुळे सोनालीच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे तिने सांगितले आहे.

नुकतेच तिने एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाविषयी एक पोस्ट तिने इंस्टाग्रावर शेअर केली असून त्यातच तिने तिच्या दृष्टीवर झालेल्या परिणामाविषयी सांगितले आहे.

तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'माझ्या आगामी पुस्तकाची घोषणा करण्याची वेळ आली आहे. हे पुस्तक लिहायला मला जरा जास्त वेळ लागला. कारण केमोथेरपीमुळे माझ्या दृष्टीवर परिणाम होऊ लागला आहे. काही दिवस तर मी काहीच वाचू शकत नव्हते. खूप घाबरले होते, पण आता सर्व ठीक आहे'

https://www.instagram.com/iamsonalibendre/?utm_source=ig_embed

Similar News