बीडमधील घटनेने सध्या सर्वत्र हाहाकार माजला आहे. सर्वांसाठी ही आँनर किलींगची घटना खुपच धक्कादायक आहे. ही घटना ज्या कार्यक्षेत्रात घडली आहे ती महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या बीडमध्ये घडली आहे. याबाबतील विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वीच पंकजा मुंडे यांनी मी बीड जिल्ह्याची गृहमंत्री आहे असे वक्तव्य केले होते. आणि त्यानंतर काही दिवसांतच ही घटना घडली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री असणाऱ्या पंकजा मुंडे यांच्या कार्यक्षेत्रात अशा प्रकारची घटना घडते म्हणजे राज्यातील इतर भाग कितपत सुरक्षित आहे असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात असून स्वत: ला बीड जिल्ह्याच्या गृहमंत्री म्हणून घेणाऱ्या पंकजा मुंडे या घटनेची जबाबदारी घेतील का असा प्रश्न उद्भवतो. पाहा हा व्हिडीओ-