पाकिस्तानातील नावजलेल्या सामाजित कार्यकर्त्या आसमा जहांगीर यांना संयुक्त राष्ट्राचा प्रतिष्ठेचा मानवाधिकार पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे. पाकिस्तानातील सैन्याच्या वाढत्या हस्तक्षेप आणि धार्मिक मूलतत्ववादी विचारधारेच्या विरोधात आसमां जहागीर सातत्याने आवाज उठवत होत्या. फेब्रुवारीला त्यांचं वयाच्या 66 व्या वर्षी ह्रदयविकाराने निधन झाले.
मुनीझी जहांगीर या त्यांच्या मुलीने युनायटेट नेशन्समध्ये झालेल्या एका विशेष समारोहात हा पुरस्कार स्वीकारला.