आज खासदार सुप्रिया सुळे यांनी खासदार निधीतून कोंढवे, न्यू कोपरे, कोंढवे धावडे, शेवाळेवाडी, मांगडेवाडी, औताडे- हांडेवाडी, भिलारेवाडी,वडकी,गुजर- निंबाळकरवाडी, वडाची वाडी, होळकरवाडी, खडकवासला या गावांना घंटागाडी दिली. त्याचे आज लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाषणातून नागरीकांशी संवाद साधला तेव्हा त्या म्हणाल्या की, कचऱ्याचे नियोजन करण्यासाठी ही घंटागाडी म्हणजे छोटीशी सुरवात आहे. अजून आपल्याला कचऱ्याचे विभाजन करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. या नियोजनासाठी प्लॅस्टिक बंदी केली गेली परंतू त्याचे नियोजन नीट केले गेले नाही. प्रत्येक गावाला 1000 कोटींचा निधी सरकारने दिला पाहिजे ते स्वत च्या जाहीरातीसाठी घालवण्यापेक्षा कचर्याचे नियोजन करण्यास स्वच्छतेसाठी दिला पाहिजे. असे बोलून त्यांनी विरोधी पक्षांवर निशाणा साधला.
पुढे त्या विकासाबाबत बोलताना म्हणाल्या की, तुमच्या सगळ्यांमुळे या विभागाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करण्याचा प्रयत्न करत आहे. सगळे प्रश्न काही सुटलेले नाहीयेत. आणि माझे आडनाव काय मोदी नाहीये त्यामुळे मी काही पंधरा लाख देईन वगैरे असे काही सांगणार नाही असे बोलून त्यांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला.
पाहा हा व्हिडीओ काय म्हणाल्या सुप्रिया सुळे-