बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार !

Update: 2018-12-22 12:04 GMT

बीडमध्ये पुन्हा धक्कादायक प्रकार ! कार्टून दाखवण्याच्या आमिषाने ३ वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

सुमित वाघमारे हत्याकांडानंतर देशभरात चर्चेत असलेल्या , बीडमध्ये पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय . मोबाईलमधील कार्टून दाखवण्याचे आमिष दाखवून अवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार परळी तालुक्यात घडलाय . याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

बाबासाहेब नानोबा चौरे (वय १९) असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी घरी कोणीच नसल्याचे पाहून आरोपीने घराच्या शेजारी राहणाऱ्या अवघ्या ३ वर्षाच्या चिमुकलीला मोबाईलमधील कार्टून दाखवतो म्हणून घरात नेले. त्यानंतर चिमुकलीवर अनैसर्गिक कृत्य केले. त्यामुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. याविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून, शनिवारी पहाटे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलय.

सुमित वाघमारे हत्याकांडानंतर पोलिसांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. जिल्ह्यात गुन्ह्यांची संख्या वाढल्याने पोलिसांचा धाक कमी झाल्याचे स्पष्ट होते. जिल्ह्यातील कायदा आणि सुवव्यवस्था धोक्यात आल्याचे सुमित प्रकरणातून समोर आले आहेच. जिल्ह्यात खून आणि अत्याचाराच्या घटनेत वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Similar News