उर्फी जावेद च्या Viral Video मध्ये तिने नेहमीप्रमाणे एक तोकडा लाल रंगाचा टॉप परिधान केलेला दिसतोय. दोन कॉन्स्टेबल तिला हाताला पकडून ऑफिस ला यायला सांगतायत. एक मिनिट.. ऑफिस ? पोलीस कधीच ऑफिस ला बोलवत नाहीत, पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेतलं असेल किंवा अटक केली असेल तर पोलीस ठाण्याला घेऊन जातात, ऑफिसला नाही. अस उर्फी जावेद म्हणाली. त्यात आपण तो व्हिडीओ व्यवस्थित पाहिला असाल तर त्यात महिला पोलिसांचे कपडे थोडे गबाळे दिसत होते. पायात स्पोर्टस् शूज घातलेले आहेत. त्यामुळे या व्हिडीयोच्या सत्यतेबाबत चाणाक्ष नेटकऱ्यांना संशय येणे स्वाभाविकच होतं. उर्फीला अटक झाल्याची बातमी नेटवर पसरली. मात्र या व्हायरल व्हिडीयोनंतर मुंबई पोलिसांनी हे संपूर्ण नाटक असल्याचं जाहीर केलं. इतकंच नव्हे तर सोशल मिडीयावर हे नाटक उघडं पाडलं
स्वतःच्या प्रसिद्धीसाठी कुणीही कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही असं म्हणत मुंबई पोलिसांनी या व्हिडीयोत वापरण्यात आलेली स्कॉर्पीओ गाडी जप्त केलीय, त्याच प्रमाणे व्हिडीयोतील तोतया पोलीसांवर गुन्हा दाखल करून अटकही करण्यात आली आहे.
दरम्यान यावर मुंबई पोलिसांनी ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं की स्वस्त प्रसिद्धीसाठी, कायद्याचे उल्लंघन करू शकत नाही! मुंबई पोलिसांनी एका महिलेला अश्लीलतेच्या प्रकरणात अटक केल्याचा एक व्हायरल व्हिडिओ खरा नाही-सन्मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर करण्यात आला आहे. तथापि, दिशाभूल करणार्या व्हिडिओमध्ये सामील असलेल्यांविरूद्ध, ओशिवरा पोलिस ठाणे येथे कलम १७१, ४१९, ५००, ३४ भा.दं.वि. अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असताना, तोतया निरीक्षक अटकेत आहे आणि वाहनही जप्त करण्यात आले आहे.
दरम्यान, नेहमी कमी कपडे घालणाऱ्या उर्फी जावेद ने पूर्ण कपडे घातल्यामुळे तिला अटक झाली आहे अशा आशयाचे मीम्स ही सध्या व्हायरल आहेत. तुमच्याकडे असे मीम्स फॉरवर्ड होत होत आले असतील तर त्यावर विश्वास ठेवू नका. एकदा मुंबई पोलीसांचा रिॲलिटी चेक करणारं निवेदन जरूर वाचा.
परंतू हा व्हिडीओ स्क्रिप्टेड आहे उर्फी जावेदची अटक होण हा त्यांचा प्रमोशन एक प्रकार असल्याचं समोर आले या संदर्भा उर्फी जावेदने इंस्टाग्रामवर स्टेटस ठेवला आहे. त्यात उर्फी म्हणाली की हे मला पोलिसांनी अटक केली, ही एक कॅम्पेनींग शुट आहे.@freakinsindia साठी ही मोहीम असल्यांचा तीन तीच्या फोटो कॅप्शन मध्ये म्हटल आहे.