“आऊ” मी भाऊबिजेला अपमान कशाला करून घेऊ ?

Update: 2018-11-08 18:58 GMT

काही दिवसांपूर्वी मराठी बिग बॉस फेम अनिल थत्ते यांनी मी भाऊबीजेला उषा नाडकर्णी यांच्याकडे जाणार असल्याचे थत्ते यांनी जाहीर केले होते. मात्र बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सुद्धा या दोघांचे नेहमी खटके उडाल्याने आता अनिल थत्ते यांनी त्यांच्या घरी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात माहिती देणारे एक पत्रक त्यांनी जाहीर केले आहे. यात त्यांनी "मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत माझे नाव घेतल्यावर त्यांनी चक्क चप्पल काढून मारण्यासाठी उगारून दाखवली.

या पार्श्वभूमीवर उषा नाडकर्णी यांच्याशी मी मानीत असलेले "बहीण भावाचे" नाते निरर्थक आणि एकतर्फी ठरते. मी भाऊबिजेसाठी आधी म्हटल्याप्रमाणे उषा नाडकर्णी यांच्याकडे जाणार नाही हे मी जाहीर करीत आहे" असे म्हटले आहे.

काय आहे पत्रकात ?

"बिग बॉस " शो दरम्यान आणि नंतरही मी कायम "ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी या माझ्या मानलेल्या "भगिनी " आहेत आणि मी भाऊबिजेला या नात्याचा सन्मान आणि पवित्रता जपण्यासाठी उषाताईंच्या घरी जाईन" असे वारंवार आवर्जून सांगितले होते.

मी आजही त्या नात्याचा अवमान किंवा अधिक्षेप होईल असे कटाक्षाने वागत-बोलत नाही.

माझी यंदा उषाताईंकडे भाऊबिजेला जाण्याची प्रामाणिक इच्छा होती..

पण "बिग बॉस " मधून बाहेर पडल्यावर उषाताईंनी दिलेल्या प्रत्येक मुलाखतीत मला शिव्यांची लाखोली वाहिली आहे.

मकरंद अनासपुरे यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीत माझे नाव घेतल्यावर त्यांनी चक्क चप्पल काढून मारण्यासाठी उगारून दाखवली.

या पार्श्वभूमीवर उषा नाडकर्णी यांच्याशी मी मानीत असलेले "बहीण भावाचे" नाते निरर्थक आणि एकतर्फी ठरते.

मी भाऊबिजेसाठी आधी म्हटल्याप्रमाणे उषा नाडकर्णी यांच्याकडे जाणार नाही हे मी जाहीर करीत आहे.

दिवाळी सुरू झाल्यापासून मला अनेक चाहत्यांकडून "जाहीर केल्याप्रमाणे उषा नाडकर्णी यांच्या कडे मी भाऊबिजेला जाणार काय? " अशी विचारणा होत असल्याने मी हा जाहीर खुलासा करीत आहे.

Similar News