सावित्री उत्सव : माझ्या साऱ्या प्रवासाचे श्रेय सावित्रीबाई फुले यांना - उर्मिला मातोंडकर

Update: 2019-01-01 08:18 GMT

मॅक्स महाराष्ट्र महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना शिक्षणाचं दार उघडं करुण देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करत आहे.बाबा राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते असल्यामुळे घरी सामाजिक वातावरण असायचं. ह्याच वातावरणात मी मोठी झाली.अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट लिहून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

माझे बाबा राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते,त्यामुळे आमच्या घरी नेहमीच सामाजिक प्रश्नांची चर्चा व्हायची. ती चर्चा ऐकत मी मोठी झाली.शिकले,अभिनयाच्या क्षेत्रात स्थिरावले.

या साऱ्या प्रवासाचे श्रेय मी माझ्या आई वडिलां बरोबर सावित्री बाई आणि ज्योतिबा फुले यांना देईन.

शेणा,दगडांचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची अवघड वाट त्या चालत राहिल्या म्हणून आपल्या साऱ्यांची प्रशस्त वाट तयार झाली.याची जाणीव आपण सर्वांनी ठेवायला हवी.त्यांची आठवण जागवायला हवी.

राष्ट्र सेवा दलाने सावित्री उत्सवाची जी हाक दिली आहे ती प्रेरक आणि स्फूर्तीदायक आहे.

मी या कृतज्ञ भावनेतून 3 जानेवारीला त्यांच्या जन्मदिवशी मी दारात एक पणती लावून त्यांना सॅल्युट करणार आहे....

 

उर्मिला मातोंडकर

अभिनेत्री

Similar News