सावित्री उत्सव :सावित्रीबाईंमुळे झालेला बदल आम्हां मुलींसाठी व स्त्रियां साठी फारच मोलाचा -अनुष्का शिंदे
मॅक्स महाराष्ट्र महिलांमध्ये शिक्षणाची ज्योत पेटवून महिलांना शिक्षणाचं दार उघडं करुण देणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस 'सावित्री उत्सव' म्हणून साजरा करत आहे. या मोहिमेत गोरेगाव येथील विवेक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारी अनुष्का शिंदे ही देखील सहभागी झाली आहे. तीने या वेळी सावित्रीबाईं मुळे मला शिक्षित होता आलं... असं देखील म्हटलं आहे.
सावित्री उत्सव
सावित्रीबाईं मुळे मला शिक्षित होता आलं .......
होय फक्त मलाच नाही तर माझ्या सारख्या अनेक मुलींना स्वातंत्र मिळाले. यांच्या मुळे आज अनेक मुली व स्त्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात दिसू लागल्या , कधी मोठ्या पडद्यावर ,कधी शाळेच्या मैदानावर , कधी शाळेमध्ये शिकवताना पण ह्या पूर्वीचे चित्र या पेक्षा किती वेगळे होते, आमच्या सावित्रीबाईंमुळे झालेला बदल आम्हां मुलींसाठी व स्त्रियां साठी फारच मोलाचा आहे
मी या दिवसाची नेहमीच वाट पहात असते, होते व नेहमीच राहणार...!!
अनुष्का शिंदे
इयत्ता दहावी विवेक विद्यालय,गोरेगाव