अनिल देशमुख यांच्या घरी ईडीचे छापे, शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Update: 2021-06-25 14:27 GMT

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीने केलेल्या कारवाईबाबत शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. अनिल देशमुखांच्या घरांवरील ईडीचे छापे या गोष्टी नवीन नाहीत. अशा कारवाईची अधिक चिंता वाटत नाही असे पवार यांनी म्हटले आहे. माजी मंत्री सुबोध मोहिते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्यावेळी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जो राजकीय विचार आपल्याला मान्य नाही त्यांच्यावर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे, हे आता नवीन नाही महाराष्ट्र आणि इतर राज्यात केंद्राने असे प्रकार सुरू केले आहेत. केंद्रात हे सरकार आल्यापासून असे प्रकार पाहायला मिळत आहे, मला काही चिंता वाटत नाही आणि लोकही त्याला गांभीर्याने घेत नाहीत, असा टोलाही पवारांनी लगावला. अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला देखील यापूर्वी यंत्रणेद्वारे त्रास दिला गेला, आणखी कुठे त्रास देता येईल का असे प्रयत्न सुरू आहेत, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर अजित पवारांच्या सीबीआय चौकशीच्या भाजपच्या ठरावावर बोलताना पवार म्हणाले की, सार्वजनिक जीवनातल्या एखाद्या राजकीय नेत्याबाबत दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने असे ठराव केल्याचे यापूर्वी कधी पाहिले नव्हते. चंद्रकांत पाटील हे कर्तृत्वाने गृहस्थ आहेत, असा टोलाही त्यंनी लगावला.

Tags:    

Similar News