Maharashtra Political crises | झिरवळ नॉट रिचेबल, संजय राऊत यांचा ट्विटमधून झिरवळ यांना चिमटा
मुंबई – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आज सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. तर दुसरीकडे अनेक नाट्यमय घडामोडी घडायला सुरूवात झालीय. कालपर्यंत माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणारे विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) मात्र अचानक नॉट रिचेबल झाल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.;
मुंबई – महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा आज सर्वोच्च न्यायालयात निकाल लागणार आहे. तर दुसरीकडे अनेक नाट्यमय घडामोडी घडायला सुरूवात झालीय. कालपर्यंत माध्यमांसमोर प्रतिक्रिया देणारे विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ (Narhari Zirwal) मात्र अचानक नॉट रिचेबल झाल्यानं अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
सत्ता संघर्षाचा आज निकाल लागणार आहे. यात विधानसभेच्या अध्यक्षांचीही महत्त्वाची भुमिका असणार. मात्र, सत्ता संघर्षात महत्त्वाची भुमिका वटवावी लागलेले विधानसभेचे तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आज सकाळपासून अचानक नॉट रिचेबल झाले आहेत. झिरवळ यांचे सर्व फोन बंद आहेत. गावाकडील घरीही झिरवळ नाहीत, त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या दिवशीच झिरवळ नॉट रिचेबल झाल्यानं राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
राऊत यांचं ट्विट पुन्हा काय झाडी डोंगर...झिरवळ...
नरहरी झिरवळ नॉट रिचेबल झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक ट्विट केलंय. या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांचा काय झाडी, काय डोंगार या प्रसिद्ध डायलॉगचा आधार घेतला. राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, “ काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र! असं ट्वीट खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.
काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ..
— Sanjay Raut (@rautsanjay61) May 11, 2023
जय महाराष्ट्र!
😄😄 https://t.co/PQqCmfWpj8