रिअली.... टू मच डेमोक्रसी; शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकरांचा मोदींना टोला
विरोधकांना विश्वासात न घेता कोरोना संकटाचे कारण सांगत केंद्र सरकारनं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द केल्याच्या निर्णयाचा सर्व स्थरातून निषेध होत असताना आता शिवसेनेत नुकत्याच प्रवेश केलेल्या अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनीही निशाणा ट्विटरवर साधता `टू मच डेमोक्रसी` असं म्हटलं आहे.
आम्ही सर्व पक्षांना विश्वासात घेऊन संसदेचे हिवाळी आधिवेशन रद्द केल्याचा दावा मोदी सरकार करत असलं तरी आता विरोधकांकडून संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्यावरून मोदी सरकारवर टीका होत आहे.
शिवसेना नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनीही ट्विट करुन निशाणा साधला आहे. "सर्वपक्षीय संमतीविनाच जिथे कायदे लादले जात असलेल्या संसदेशिवाय संपूर्ण देश खुला झाला आहे," असा टोला मातोंडकर यांनी लगावला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी हा निर्णय जाहीर केला होता. महाराष्ट्रात नुकतेच विधीमंडळाचे हिवाळी आधिवेशन पार पडले. हे आधिवेशन दोन दिवसाचे असल्यावरुन भाजपने टीका केली होती.
शिवसेना नेत्या व अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनीही मोदी सरकारवर टीकेची तोफ डागली आहे. "राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. त्यासाठी प्रचंड मोठ्या सभा घेण्यात आल्या. सर्व पक्षांच्या चर्चेशिवाय जिथे कायदे लादले जात आहेत, ती संसद वगळता संपूर्ण देश खुला झाला आहे. खरोखरच खूप लोकशाही आहे. (टू मच डेमोक्रसी)," असं म्हणत ऊर्मिला मातोंडकर यांनी मोदी सरकारच्या निर्णयावर निशाणा साधला आहे.
सामाजिक कार्यकर्ते आनंद शितोळे यांनी फेसबुक वरुन आधिवेशन रद्द करण्याचा निर्णयावर टीका केली.
ते म्हणतात, आदरणीय मोदीजी म्हणजे समयसूचकता, प्रखर स्वामिनिष्ठा , प्रामाणिकपणा यांचं मूर्तिमंत उदाहरण आहेत.१४ सप्टेंबर २०२० ला कोरोना ऐन भरात असताना एकाच दिवशी ८३८०९ रुग्ण सापडले.विशेष म्हणजे त्या काळात कोरोनाच्या लसीचा कुठलाही अंदाज किंवा चिन्ह नव्हती.मात्र आदरणीय मोदींजींचे धाडस पहा, जीवावर उदार होऊन संसदेचे पावसाळी अधिवेशन बोलावून त्यामध्ये शेतकरी कायदे मंजूर करवून घेऊन अत्युच्च स्वामिनिष्ठा काय असते हे दाखवून दिलं.१४ डिसेंबर २०२० ला कोरोना असताना आणि देशभरात २२६०५ रुग्ण सापडले असताना ( जो पाच महिन्यात सगळ्यात कमी आकडा आहे ) आदरणीय मोदींजींनी समयसूचकता दाखवून शेतकरी कायद्यावर होणारी चर्चा,विरोध वगैरे सगळं टाळून पुढे जाण्यासाठी संसदेचे हिवाळी अधिवेशनच रद्द केलेलं आहे.
असा महापुरुष कित्येक युगात झालेला नाही आणि होणारही नाही,
शेतकऱ्यांनी ही बाब नेहमी लक्षात ठेवली पाहिजे.
#सबकानंबरआयेगा
#IStandWithFarmers