शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कधी आणि कशी करावी?

Update: 2022-06-10 14:13 GMT

वर्धा : मान्सून कोकणात दाखल झाला असला तरी अजून राज्यभरात पाऊस सुरू झालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी कधी करावी, याबाबत संभ्रम आहे. पण आता कृषी अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे. 75 ते 100 मिमी पाऊस झाल्यानंतरच सोयाबीन पिकाची पेरणी करावी, असे आवाहन कृषि विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. प्रति हेक्टरी बियाणे दर 75 किलोवरुन 50 ते 55 किलोवर आणण्यासाठी टोन पध्दतीने किंवा प्लँटरचा वापर करुन पेरणी करावी. सोयाबीनची उगवण क्षमता 70 टक्केपेक्षा कमी असल्यास उगवणक्षमतेच्या प्रमाणात अधिकचे बियाणे पेरणीसाठी वापरण्यात यावे. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाण्याला बुरशीजन्य रोगांपासून संरक्षणासाठी 3 ग्रॅम थायरमची बिजप्रक्रिया करावी. रायझोबियम व पीएसबी जिवाणू संवर्धकाची प्रत्येकी 200 ते 250 ग्रॅम प्रति 10 ते 15 किलो बियाण्यास पेरणीपुर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करुन बियाणे सावलीत वाळवावे. त्यानंतर पेरणी करावी. बियाण्याची पेरणी 3 ते 4 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी, असे वर्धा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Tags:    

Similar News