कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाजार समितीत सतत माराव्या लागतायत फेऱ्या

Update: 2024-12-21 14:56 GMT

YAVATMAL | कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांना बाजार समितीत सतत माराव्या लागतायत फेऱ्या

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सीसीआयच्या केंद्राकडे हमीभावाने कापूस विकायचा आहे. मात्र स्थानिक बाजार समितीमध्ये सुरु असलेल्या कापूस विक्रीच्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेत गोंधळ सुरु असल्यामुळे शेतकरी त्रस्त आहे. केंद्र शासनाने २०२४-२५ या वर्षाच्या सीसीआयच्या खरीप हंगामात माध्यमातून देशभरातील ५०० केंद्रावर कापूस खरेदी सुरू केली आहे. महाराष्ट्रात १२० केंद्र असून त्यातील ६१ केंद्रे विदर्भात आहेत. प्रामुख्याने यवतमाळ जिल्ह्यात १० कापूस खरेदी केंद्र आहेत. कापूस विक्रीसाठी बाजार समितीत शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. मात्र ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने शेतकऱ्यांना तीन ते चार दिवसांपर्यंत सतत स्थानिक बाजार समितीमध्ये यावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Full View

Tags:    

Similar News