शेतकऱ्यांच्या बोगस धाडीवरून शिंदे गट आणि भाजप भिडले...
राज्यात शेतकऱ्यांसोबत चुकीचे प्रकार भाजपा खपवून घेणार नाही, भाजपा किसान मोर्चाचा इशारा;
राज्यात शेतकऱ्यांसोबत चुकीचे प्रकार भाजपा खपवून घेणार नाही, असे आवाहन भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे यांनी सिल्लोड येथे केले आहे.सध्या राज्यात कृषी विभागाचे असल्याचे भासवून पैसे उकळण्यासाठी ठिकठिकाणी बोगस धाडी टाकण्यात येत असून यामधून व्यापारी वर्गाकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत. ज्या ठिकाणी असे प्रकार आढळून आल्यास संभ्रमित न होता स्थानिक भाजपा किसान मोर्चा पदाधिकारी किंवा भाजपा कार्यकर्त्यांना संपर्क साधाण्याचे आवाहन भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस मकरंद कोर्डे यांनी सिल्लोड येथे केले आहे.