पारंपरिक शेती पद्धतीला फाटा देत नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने सोनगीर येथील शेतकरी किशोर पंडीत माळी यांनी दीड एकर क्षेत्रात उमरान जातीच्या बोरांची लागवड करून विक्रमी उत्पन्न घेत आहे. उमरान जातीच्या बोरांना परराज्यात मोठी मागणी असल्याने उत्पन्न ही समाधान कारक मिळत आहॆ. माळी कुटूंब गेल्या १५ वर्षापासून सेंद्रिय खतंपासून बोरांचे उत्पन्न घेत आहेत कलकत्ता सिलुगुडी गुजरात राज्यात बोरांना चांगली मागणी आहॆ.