Jambhul चारशे रुपये किलोने विक्री होत आहे जांभूळ..
चारशे रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होत असून कोणी पावशेर आणि अर्धा किलो असे जांभूळ घेऊन जात आहे. जांभूळ बघून जांभूळ खरेदी करण्याचा मोह आवरता आले नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.;
छत्रपती संभाजीनगर, शहरातील गुलमंडी परिसरामध्ये सध्या जांभूळ विक्रीसाठी आलेले आहे. ग्रामीण भागामध्ये सध्या जांभळ अजून आलेले नाही नगर जिल्ह्यातून हे जांभूळ सध्या शहरात विक्रीसाठी आले असून त्याला चारशे रुपयांचा भाव मिळत आहे. शहरातील जुनी बाजारपेठ असलेल्या गुलमंडी परिसरामध्ये नागरिक खरेदी करण्यासाठी येत असून त्यांना जांभूळ घेण्याचा मोह आवरता येत नाही. चारशे रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री होत असून कोणी पावशेर आणि अर्धा किलो असे जांभूळ घेऊन जात आहे. जांभूळ बघून जांभूळ खरेदी करण्याचा मोह आवरता आले नसल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.