नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचं 'ते' पत्र आठवतंय का?: विजय जावंधिया
Farmer leader Vijay jawandhia write letter to PM Modi over Cotton Issue;
नवीन कृषी कायद्याने शेतकऱ्याचं सर्व काही All Is Well होईल. असं चित्र सध्या केंद्र सरकारकडं रंगवलं जात आहे. नवीन कृषी कायद्यानं मधल्या दलालाचं वर्चस्व मोडीत निघेल असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं आहे.
पंतप्रधानांनी अटल टनेज योजनेचं उद्घाटन करताना हिमालयातील शेतकऱ्यांना हिमालयात 40 ते 50 किलो रुपये मिळणारे सफरचंद दिल्लीत 150 रुपये किलो विकते? मधील 100 रुपये कुठे जातात? असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला.
हाच धागा पकडत शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना त्यांनी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांना कापूस निर्यातीसंदर्भात लिहिलेल्या पत्राची आठवण करुन दिली आहे. तसंच जावंधिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या या पत्रात कापसाचे भाव कमी होऊन देखील कपड्याचे भाव कमी झाले का? कापूस स्वस्त झाला तरी कपडे महाग का मिळतात? असं म्हणत कापूस क्षेत्रातील दलालांचा बंदोबस्त करण्याची मागणी मोदी यांना केली आहे.
पाहा काय आहे हे पत्र, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी मॅक्समहाराष्ट्र शी केलेली बातचित...