मी जेव्हा नेहरुंना पाहिले...
2014 मध्ये भाजपा सत्तेत आल्यापासून वारंवार नेहरूंना दोष दिला जातो? सत्तर वर्षात काय केले असे प्रश्न उपस्थित केले जातात? जिवंतपणी नेहरुंना तीनदा पाहिलेल्या लेखापरीक्षक प्रकाश झावरे पाटील यांनी अनुभवलेले नेहरू...;
जन्माने ब्राह्मण ! आई स्वरुप देवी सश्रध्द हिंदु..त्यामूळे बालवयातच वेदाचार्यांकडून जवाहरलाल यांचा वेद- उपनिषदांचा पक्का अभ्यास करुन घेतला.वडील उच्चविद्याविभूषित उदारमतवादी ख्यातकिर्त धनाढ्य विद्वान वकील..लेकाचे शिक्षण विलायतेतच करुन घेतले.सहाजिकच पंडीत जवाहरलाल नेहरु सरळ आधुनिक व प्रगल्भ विज्ञाननिष्ठ विचारांचा व भारताच्या समग्र इतिहास, संस्कृती आणि विवेकवादाचा वारसा घेऊनच भारतीय राजकारणात उतरले. ते स्वत: नास्तिक होते परंतू परंपरांचा सन्मान ठेवणारे सह्रदही होते. फ्रँक मोरॅस या आंतरराष्ट्रीय पत्रकाराने एकदा विचारलेच..
" Sir..! Why you don't attend Gandhiji's evening prayers..?"
Nehru answered with smile.....
" Oh..! I am dutybound. I look after the arrangement of his prayers...!"
सर्वधर्मसमभावच नव्हे तर पंडीत नेहरु " निधर्मी " राजवटीचे, वैज्ञानिक प्रगल्भतेचे व आचरणाचे कट्टर पुरस्कर्ते राहीले.
हिमालय- गंगा व सर्व नद्या- संस्कृती- लोकसंस्कृती- साहित्त्य- वेद उपनिषदे..इतिहासाचा त्यांचा गाढा अभ्यास होता. त्यांच्या साहित्त्यातून व भाषणांमधून त्याची प्रचिति येते. गंगा नदी म्हणजे भारताच्या लोकसंस्कृतीची प्राचीन लोकधारा आहे..यावर त्यांची ठाम श्रध्दा होती..!!
गंमत येथेच आहे जन्माने ब्राह्मण व भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणारे म्हणून ते मूलनिवासींच्या तर नास्तिक, निधर्मी, विज्ञानवादी, विवेकी म्हणून सनातनींच्या " रडार " वरती कायम राहिले व पुढेही राहतील...तसे ते रहावेत यासाठी त्यांनीच लोकशाही शासन यंत्रणेची मजबूत पायाभरणी केली आहे..! तोच पंडीत नेहरुंचा अजरामर इतिहास आहे..वारसाही आहे.
प्रसिद्ध पत्रकार कुलदीप नैय्यर यांचेशी एका पत्रकार परिषदेत..
" Do not spare my mistakes & short comings..attack bravely..!"
This was his " Challange " to the Press..!!
किती फरक पडला ना लोकशाही व्यवस्थेत............!!
माझ्या पिढीतील " नेहरु चाचांना सदैव " शिरसाष्टांग दंडवत..! बालपणी तिन वेळा चाचांना जवळून पाहण्याचे भाग्य लाभलेला...मी...!!