MPSC: राज्यसेवा परीक्षा कोणती पुस्तकं वाचावीत?

MPSC: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या संदर्भात अभ्यास पद्धती, संदर्भ ग्रंथ या संदर्भात आंबेडकरवादी मिशन मंडळचे प्रमुख दीपक कदम यांचे मार्गदर्शन Which book should refer for MPSC Explain by Dipak kadam

Update: 2021-10-05 15:52 GMT

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा परीक्षा 2021 ची जाहिरात नुकतीच प्रकाशित करण्यात आली. त्यानुसार 2 जानेवारी 2022 ला पूर्व परीक्षा 37 केंद्रावर घेतली जाणार आहे. तर मुख्य परीक्षा 7,8,9 मे 2022 रोजी घेतली जाईल.

परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 25 ऑक्टोबर 2021 असून मागासवर्गीयांसाठी 544 रुपये इतर मागासवर्गीयांसाठी 344 रुपये चा शुल्क आकारला जाईल. महाराष्ट्रातील 30 वर्ग-1 व वर्ग-2 पदाच्या साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवेच्या माध्यमातून अधिकाऱ्यांची निवड करत असते.

2021 च्या जाहिराती मध्ये विविध 17 पदांसाठी जाहिरात काढण्यात आली आहे. एकूण 290 पदांसाठी जाहिरात आहे. भविष्यात पूर्व परीक्षा नंतर काही पदांची वाढ यामध्ये होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

परीक्षेसाठी शैक्षणिक अहर्ता पदवी किंवा पदवीच्या तिसऱ्या वर्षातील विद्यार्थी यांचे अंतिम वर्षाचे निकाल मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना आले पाहिजे.

वयोमर्यादा सर्वसाधारण विद्यार्थ्यासाठी जास्तीजास्त 38 वर्ष, तर अनुसूचित जाती जमाती साठी 43 वर्ष, माजी सैनिक खेळाडू यांच्यासाठी 43 वर्षे, दिव्यांगासाठी 45 वर्ष असेल.

परीक्षेत अटेंमस सर्वसाधारण विद्यार्थ्यांना सहा वेळा, ओबीसींना नऊ वेळा व अनुसूचित जाती आणि जमातीसाठी वयाच्या ४३ पर्यंत किती वेळा परीक्षा देता येईल.

सविस्तर जाहिरातीसाठी, अभ्यासक्रमांसाठी, परीक्षा केंद्राच्या माहितीसाठी व इतर सविस्तर माहितीसाठी लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती घ्यावी (mpsc.gov.in)

राज्यसेवा पूर्व परक्षेचे स्वरूप

राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी पेपर 1 आणि पेपर 2 असे प्रत्येकी दोनशे गुणांचे दोन पेपर असतील.

(एकुण ४०० गुण)

पेपर एक: सामान्य ज्ञान गुण 200 प्रश्न 100 वेळ दोन तासाचा.

पेपर दुसरा c sat..

गुण 200 प्रश्न 80 वेळ दोन तासाचा.


अभ्यासाची पद्धती

परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा बारकाईने अभ्यास करावा.

2013 पासून राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचा अत्यंतिक सूक्ष्मपणे अभ्यास करावा. यासाठी अनेक वेळा दहा वीस पंचवीस वेळा प्रश्नपत्रिका वाचून विश्लेषणात्मक अभ्यास करावा.

बारावीपर्यंत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे इतिहास, भूगोल, पर्यावरण, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांच्या पुस्तकांचा गांभीर्यपूर्वक अभ्यास करावा.

विविध विषयांची संदर्भग्रंथ यांचा अभ्यास

शासनातर्फे प्रकाशित होणाऱ्या विविध मासिके वार्षिक अहवाल अर्थसंकल्प, आर्थिक पाहणी अहवाल यांचा अभ्यास करावा.

चालु घडामोडी साठी एक इंग्रजी दैनिक एक मराठी दैनिक, DD न्यूज काही उत्तम स्पर्धा परीक्षेची इंग्रजी आणि मराठीतील मासिके यांचा अभ्यास

प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची दिशा समजून घेऊन वरील अभ्यास साधनांचा एकत्रितपणे सखोल अभ्यास करावा.

मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका व सराव म्हणून इतर प्रश्नपत्रिका किमान 50 प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करावा.

अभ्यासासोबत रिविजन ला आत्यंतिक महत्त्व आहे. त्यामुळे परीक्षेच्या किमान एक महिना अगोदर तरी आपला अभ्यास पूर्ण करुन संपूर्ण उजळणी किमान तीन ते पाच वेळा होणे आवश्यक आहे.

संदर्भ ग्रंथ अभ्यास साहित्य...

बारावी पर्यंतचे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाचे इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, पर्यावरण, समाजशास्त्र, राज्यशास्त्र या विषयाची क्रमिक पुस्तके याशिवाय आठवी ते दहावी विज्ञानाची क्रमिक पुस्तकांचा पायाभूत अभ्यास म्हणून करावा.

इतिहासासाठी आधुनिक हिंदुस्थानचा इतिहास जयसिंग पवार व स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास बिपीनचंद्र, महाराष्ट्राचा इतिहास नववीचे क्रमिक इतिहास चे जुने पुस्तक

भूगोल महाराष्ट्राचा भूगोल, सवदी महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल नववीचे क्रमिक जुन्या अभ्यासक्रमाचे पुस्तक.

आठवी ते दहावीचे विज्ञानाचे क्रमिक ची पुस्तके व विज्ञान व तंत्रज्ञान टाटा मॅकग्राहिल किंवा स्पेक्‍ट्रम प्रकाशनाची पुस्तके

भारतीय राज्यव्यवस्था लक्ष्मीकांत व भारतीय संविधान डीडी बसू.

अर्थशास्त्रासाठी महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी, अहवाल भारताचा आर्थिक पाहणी अहवाल, महाराष्ट्र व भारताचा अर्थसंकल्प इंडियन इकॉनॉमी दत्त आणि सुंदरम...

अकरावी आणि बारावीचे क्रमिक चे पर्यावरणाची पुस्तके

चालू घडामोडीसाठी मनोरमा 2021, भारत 2021, लोकसत्ता/ सकाळ समूहाने प्रकाशित केलेली वार्षिक विशेषांक, विझार्ड वार्षिक विशेषांक

विविध प्रकाशनांची काही दर्जेदार गाईड्स विद्यार्थी आपल्या पसंतीने वापरू शकतात.

एक इंग्रजी व एक मराठी दैनिक

लोकराज्य,योजना, कुरुक्षेत्र ही शासनाचे मासिके

इंग्रजी व मराठी भाषेतील स्पर्धा परीक्षेची मासिके

C sat साठी आर एस अग्रवाल यांचे verbal and nonverbal व कॉन्टिटी अटीट्युड ही दोन पुस्तके सोबतच

उतारे यांच्या अभ्यासासाठी मागील वर्षात विचारलेल्या प्रश्नपत्रिकेतील मराठी उतारे.

विविध वर्तमानपत्रातील संपादकीय तीन ते पाच मिनिटात वाचण्याची व समजून घेण्याचा सराव करणे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यशस्वी होण्यासाठी पेपर दुसरा c sat हा आत्यंतिक महत्त्वाची भूमिका बजावतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मराठी उतारे दररोज नियमितपणे सोडवण्याचा सराव करावा.

दीपक कदम

प्रमुख, आंबेडकरवादी मिशन

Tags:    

Similar News