मणिपूर नुसता शब्द उच्चारला तरी डोळ्यासमोर जाळपोळ, आंदोलन आणि त्या दोन महिलांची नग्न धिंड एका क्षणात सारंकाही डोळ्यासमोरून जातं. मेतेयी, कुकी आणि नागा समुदाय अचानक हिंसक, अशांत कसे बनले ? महिलांची नग्न धिंड काढल्याची घटना मे २०२३ मधली आहे. मात्र, जवळपास ७८ दिवसानंतर तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. इतकं सगळं घडतांना केंद्र सरकारकडून ठोस कृती अपेक्षित होती. मणिपूरच्या हिंसाचारामागे नेमका मुद्दा काय आहे ? मणिपूरमधल्या संघर्षाचं नेमकं कारण काय ? मणिपूरचा इतिहास हा अस्वस्थतेचा, अशांततेचा आणि हिंसेनं भरलेला का आहे ? हे सगळं अत्यंत सोप्या भाषेत समजून घेऊया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या हेडलाईन्सच्या पलीकडे या विशेष व्लॉगमधून...