'भारत जोडो' यात्रेचा आर्थिक अंगाने विचार का होत नाही?
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेचे राजकीय, सामाजिक अंगाने अनेक जणांनी विश्लेषण केले आहे. पण या यात्रेचा आर्थिक अंगाने विचार का होत नाही, याबाबतचे परखड विश्लेषण करणारा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख...;
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. या यात्रेचे राजकीय, सामाजिक अंगाने अनेक जणांनी विश्लेषण केले आहे. पण या यात्रेचा आर्थिक अंगाने विचार का होत नाही, याबाबतचे परखड विश्लेषण करणारा अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांचा लेख...संजीव चांदोरकर यांच्या फेसबुक पेजवरुन साभार...
काल सुरु झालेल्या "भारत जोडो" यात्रेचे स्वागत करणाऱ्या काही पोस्ट "अर्थ अन्वयार्थ" ग्रुपवर फॉरवर्ड केल्यानंतर काही फेसबुक मित्रांनी हा ग्रुप फक्त आर्थिक बाबींशी संबंधित आहे , तर या पोस्ट कशा काय अशी विचारणा केली ; त्यांच्यासाठी आणि त्यानिमित्ताने अर्थ अन्वयार्थ ग्रुपच्या वैचारिक भूमिकेविषयी देखील
मुळात शुद्ध आर्थिक असे काही अस्तित्वात नसते, कधीच नव्हते ; अर्थकारणात राजकारण नको हा गेल्या ४० वर्षात हेतुतः केला गेलेला प्रचार आहे ; हे मांडणारे त्यांना सोयीचे त्यावेळी फक्त राजकीय शक्तींचाच आसरा घेतात
अर्थशास्त्र हे भौतिक, रसायन, खगोल शास्त्रासारखे नैसर्गिक विज्ञान नाही , ते सामाजिक विज्ञान (सोशल सायन्स) आहे , म्हणून मानव निर्मित आहे ;
लोकशाही राष्ट्रात अर्थव्यवस्थेचा एकमेव उद्दिष्ट त्या देशातील जास्तीत जास्त नागरिकांचे लोककल्याण हाच असला पाहिजे ; नाहीतर लोक कशाला राजकीय नेत्यांना निवडून देतील ?
अर्थव्यवस्था नेहमीच राजकीय अर्थव्यवस्था असते; अगदी शुद्ध खाजगी / शुद्ध मार्केट तत्वज्ञान राजकीय पाठिंब्याशिवाय / हस्तक्षेपाशिवाय एक दिवस देखील टिकू शकत नाही
माणसाच्या भौतिक प्रगतीएवढेच माणसाचे आत्मसम्मानाचे प्रश्न महत्वाचे आहेत ; स्त्रियांचे प्रश्न महत्वाचे आहेत आणि त्यांचा जैव संबंध आर्थिक प्रश्नांशी आहे ; म्हणून त्यासंबंधात विषय "तथाकथित शुद्ध"आर्थिक व्यासपीठांवर आणले पाहिजेत
देशात सुरू असणाऱ्या भारत "तोडो"मुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होत आहेत , भविष्यात होऊ शकतात हे जाणण्यासाठी आवश्यक असणारा बौद्धिक प्रामाणिकपणा ज्यांच्याकडे आहे आणि इथे अर्थव्यवस्था म्हणजे जीडीपी / सेन्सेक्स /परकीय भांडवल नाही तर १४० कोटी नागरिकांचे मनस्वास्थ्य , त्यांना सुरक्षित वाटणे , त्यांचे राहणीमान , प्रत्येकाच्या घरातील लहान मुले / म्हातारी माणसे याना आश्वासक वाटणे !
हे ज्यांना पटेल त्यांना "भारत जोडो" यात्रेचे महत्व कळेल आणि ते त्यांचे स्वागतच करतील
संजीव चांदोरकर (९ सप्टेंबर २०२२)