भारतीय राजकारण आणि निवृत्तीची अवघड वाट, पहा सुहास पळशीकर यांचे विश्लेषण
भारतीय राजकारणात निवृत्त होण्यात नेमक्या काय अडचणी आहेत? याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांचे विश्लेषण नक्की वाचा...;
अमेरिकेत जसं आहे की अध्यक्ष दोनदा स्वतः येतं. अशा प्रकारच्या काही मर्यादा असतात. भारतात तर त्याही मर्यादा नाहीत. त्यामुळे भारतातली उदाहरणं तुम्हाला चकित करून सोडतील. अगदी अलीकडेच निधन पावलेले शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल हे तब्बल त्यांच्या नव्वदीपर्यंत मुख्यमंत्री पदावर होते. तीच गोष्ट करुणानिधींची द्रविड या पक्षाच्या नेत्यांची सांगता येईल. काहीजण ज्याच्यावर असं म्हणतात की हा सगळा कुटुंबाचा मामला असतो. आणि आपण त्याच्याबद्दल बोलूच नये. पण फक्त कुटुंबाचा हा मामला असतो असंही नाही. उदाहरणार्थ मार्क्सवादी communist पक्षाचे नेते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू हे असेच जवळपास पंच्याऐंशीव्या वर्षापर्यंत म्हणजे ऐंशीच्या घरात गेल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री पदावर राहिले होते आणि शेवटी त्यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे आपलं पद सोडलं. ते पक्षाचे असतील तेही असेच ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत वयाच्या काम करत होते. याचा अर्थ असा झाला की मूळ सूत्र हे आहे की राजकारणात तुम्ही एकदा पडलात की त्याच्यातून निवृत्त होणं हे फार अवघड जातं.
हे ही वाचा- राजकारणातून निवृत्त होण्याचा मार्ग खडतर असतो का? , सुहास पळशीकर यांचे विश्लेषण