इन्फोसिस नंतर "पांचजन्य" चे अॅमेझॉनवर आरोपपत्र

इन्फोसिस नंतर संघाचं मुखपत्र असलेल्या “पांचजन्य” ने अॅमेझॉनवर आरोप केला आहे. मात्र, प्रश्नाच्या मुळात न जाता, एखाद्या विषयावर राळ उडवायची. मोघम आरोप करायचे, राष्ट्रप्रेमाला उचकवायचे. असं तंत्र पांचजन्य वापरत आहे का?वाचा संजीव चांदोरकर यांचं विश्लेषण;

Update: 2021-09-29 14:16 GMT

इन्फोसिस नंतर संघाचं मुखपत्र असलेल्या "पांचजन्य" ने अॅमेझॉनवर आरोप केला आहे. मात्र, प्रश्नाच्या मुळात न जाता, एखाद्या विषयावर राळ उडवायची. मोघम आरोप करायचे, राष्ट्रप्रेमाला उचकवायचे. असं तंत्र पांचजन्य वापरत आहे का?वाचा संजीव चांदोरकर यांचं विश्लेषण

"पांचजन्य" या संघ परिवारातील नियतकालिकाने अॅमेझॉन ही ईस्ट इंडिया कंपनीचा नवीन अवतार असल्याचा आरोप केला आहे. त्याला 'स्वदेशी जागरण मंच' या संघ परिवारातील दुसऱ्या व्यासपीठाने देखील दुजोरा दिला आहे.

ईस्ट इंडिया कंपनी फ्रंट वापरून ब्रिटिशांनी भारताला वसाहत बनवली. तशी अॅमेझॉन आपल्या अर्थव्यस्वस्थेकडे बघत आहे. हा गर्भितार्थ आहे. अॅमेझॉन दादागिरी करते, धंदा करतांना अनैतिक मार्ग अवलंबते आणि अॅमेझॉनने भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली. असे आरोप पांचजन्य ने केले आहेत.

हे यांचे टिपिकल आहे. राळ उडवायची. मोघम आरोप करायचे, राष्ट्रप्रेमाला उचकवायचे पण प्रश्नाच्या मुळात जायला नकार द्यायचा.

1) ज्यावेळी साम्राज्य-वसाहत असे शब्द येतात. त्यावेळी देशी-परदेशी, आपला-तुपला हे डोक्यात असते. अॅमेझॉन किंवा किती तरी बहुराष्ट्रीय कंपन्या भारतात आल्या आहेत. कायद्याला धरून. पण मग पांचजन्य वगैरे त्या एफडीआय संबंधित कायद्यांवर टीका करणार नाही. सरकारवर, धोरणांवर टीका नाही, कंपनीवर टीका, व्यक्तींवर टीका. हा बुद्धिभेद केला जातो.

2) अॅमेझॉनच्या दादागिरीवर आक्षेप असेल तर भारतीय ओरिजिनच्या मोठ्या कंपन्यांच्या दादागिरीवर पण आक्षेप असला पाहिजे; भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप योग्य त्या कायद्याखाली तपासता येईल, त्याचा वसाहतवादाशी काय संबंध?

3) अॅमेझॉनचे आणि अगदी फ्लिपकार्टचे आणि रिलायन्सच्या जिओचे मॉडेल, हजारो कोटी रुपयांच्या तोटा करण्याच्या क्षमतेवर आधारित आहे. स्पर्धकांना अंडरकट करायचे, त्यांची रक्त ओकेपर्यँत दमछाक करायची आणि मग आपली मक्तेदारी स्थापन करायची, या कॉर्पोरेट भांडवलशाही बद्दल, आपले कॉम्पिटिशन कमिशन कसे दंतहीन आहे. त्याबद्दल चकार शब्द काढायचा नाही.

तुम्ही अॅमेझॉनच्या बाजूचे की विरोधी असे शाळकरी प्रश्न टाकू नयेत, दूर राहावे; हे सगळे इश्यू मेंदूला टॅन दिल्याशिवाय समजणार देखील नाहीत.

Tags:    

Similar News