शिक्षणाचं बाजारीकरण रोखणारे पी. जी. दस्तूरकर...
शिक्षणाचे बाजारीकरण रोखणारे माजी शिक्षक आमदार पी.जी. दस्तूरकर यांचा ११वा स्मृतिदिवस... या निमित्ताने त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांनी शिक्षण विभागात केलेल्या कार्यांचा घेतलेला आढावा नक्की वाचा
शिक्षण आणि शिक्षकांची जाण असलेले नेते आता फारच कमी पाहायला मिळतात. त्यातच महाराष्ट्राच्या विधानपरिषदेवर शिक्षक मतदार संघातून निवडूण आलेले आमदार खरंच शिक्षकांचे प्रतिनिधीत्व करतात का? असा प्रश्न जेव्हा आपल्याला पडतो तेव्हा महाराष्ट्र सरकारने शिक्षण विक्रीला काढले आहे का? असा सवाल करणारे पी. जी. दस्तूरकर आठवल्याशिवाय राहत नाही.
शिक्षणाच्या प्रश्नावर सरकारला घाम फोडणारे आणि शिक्षकांना न्याय मिळवून देणारे पी. जी. दस्तूरकर यांचा आज 11 वा स्मृतिदिवस... या दिनानिमित्त पी. जी. दस्तूरकर यांचं जीवन आणि त्यांनी शिक्षण विभागात केलेले कार्य याचा त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त घेतलेला आढावा.
दस्तूरकर जेव्हा शिक्षण आणि शिक्षक यांच्या प्रश्नावर बोलायला उभे राहायचे तेव्हा वीजेसारखे कडाडल्याशिवाय राहत नव्हते.1992 ला पी.जी. दस्तूरकर हे मराठवाडा (नांदेड)शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. पी.जी. दस्तूरकर यांनी विधान परिषदेत प्रवेश करताच त्यांनी त्यांच्या पहिल्याच भाषणात शिक्षण क्षेत्रातल्या बाजारीकरणावर ठाम भूमिका घेत महाराष्ट्रात आपली एक वेगळीच छाप निर्माण केली.
महाराष्ट्र सरकारने शिक्षण क्षेत्र विकायला काढलंय आणि शिक्षण क्षेत्राचा बाजार मांडला असून हा बाजार मी बंद करणार असल्याचं विधान प्रभाकर गंगाराम दस्तूरकर यांनी आपल्या पहिल्या भाषणात केलं.
एकच प्रणाली असावी…
विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी एकच प्रणाली असली पाहिजे. बिहारची राज्याची शिक्षण प्रणाली पाहा.. मी पंतगराव (पतंगराव कदम) पवारांना (शरद पवार) यांना सांगणार आहे. तुम्ही जा बिहारला शिक्षणासाठी नाही तर मला पैसे द्या… मी जातो शिक्षणाचा अभ्यास करायला. प्राथमिक शिक्षण, मागासवर्गीय शिक्षण, जिल्हा परिषदेच्या बदल्यांचा अभ्यास करणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं होतं. आजही तो प्रश्न कायम आहे.
दस्तूरकर फक्त शिक्षणापुरतेच लिमिटेड राहिले नाही. त्यांनी आपल्या चळवळीच्या माध्यमांतून कामगारांचे प्रश्न, शेतकरी, शेत-मजूरांचे प्रश्न यासारख्या अनेक विषयावर त्यांनी आवाज उठवलाच त्याचबरोबर लोकांना न्याय पण मिळवून दिला. विधान परिषदेची आमदारकी कोणाच्या बापाच्या ठेकेदारी नाही... विधानपरिषदेची आमदारकी कुणाच्या बापाची ठेकेदारी नाही, मक्तेदारी नाही. शिक्षकांनी मला निवडून दिलं माझा काही वारसा हक्क नाही. आमदारकीने मला जे आयुधं दिली ती मी समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी नक्की वापरेल. अशा विचारांचे दस्तूरकरांनी समाजात आपलं वेगळचं स्थान निर्माण केलं. शिक्षण कायद्याचे बिल आणणार तसेच शिक्षकांचा दर्जा वाढला तर विद्यार्थ्यांचा वाढेल आणि देशाचा देखील दर्जा वाढेल. असे विचार दस्तूरकरांनी आपल्या पहिल्या भाषणात मांडले.
पी. जी. दस्तूरकर यांचा जीवन प्रवास...
१९६९ मध्ये काही शिक्षक सहकाऱ्यांनी मिळून लातूरला मराठवाडा शिक्षक संघ स्थापित केला. या संघटनेचा मूळ उद्देश शिक्षकांचे प्रश्न सोडवणे असून दस्तूरकर हे संघटनेचे संस्थापक सदस्य होते.
१९७० च्या दशकात मराठवाडा शिक्षक मतदार संघ हा नाशिक शिक्षक मतदार संघ यात समाविष्ट होता. मराठवाडा शिक्षक मतदार संघ हा स्वतंत्र मराठवाड्याला वेगळा मिळाला पाहिजे या साठी या संघटनेने एक लढा दिला. बाकी सर्व शिक्षक संघटना मिळून या मागणीसाठी एकशिष्ट मंडळ दिल्ली ला गेले (१९७० ते १९७३) फोटो मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक व केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांची भेट घेतली असता १९७३ मध्ये मराठवाडा शिक्षक मतदार संघ हा स्वतंत्र मराठवाड्याला मिळाला ....
त्यांच्या एका आंदोलनामुळे तत्कालीन शिक्षकांना सहावा वेतन आयोग मिळाला होता. आजही शिक्षकांचे प्रश्न अडल्यानंतर जुन्या पिढीतील शिक्षक दस्तूरकर यांची आठवण काढल्याशिवाय राहत नाही.